नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि लक्ष्यवेध फाऊंडेशनच्या सहकार्याने मुख्यमंत्री चषकाचे नियोजन
✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि लक्ष्यवेध फाऊंडेशनच्या सहकार्याने मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेचे शुक्रवारी २८ फेब्रुवारी स्व. रतन टाटा परिरसर लक्ष्यवेध मैदान नरेंद्र नगर येथे रोजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते श्री. स्वप्नील जोशी यांची उपस्थिती होती. मंचावर स्पर्धा आयोजनाचे मार्गदर्शक आमदार श्री. प्रवीण दटके, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी होते. मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, उपायुक्त श्री. विनोद जाधव, मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या स्वागत समितीचे अध्यक्ष माजी महापौर श्री. संदीप जोशी, स्पर्धा स्वागत समितीचे उपाध्यक्ष श्री. अविनाश ठाकरे, मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, माजी खासदार श्री. अशोक नेते, माजी आमदार श्री. गिरीश व्यास, भारतीय कबड्डी संघाचे सचिव श्री. जितेंद्र सिंग, माजी स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर, माजी नगरसेवक श्री. संदीप गवई, माजी नगरसेविका श्रीमती विशाखा मोहोड, श्रीमती जयश्री वाडीभस्मे, स्पर्धेचे संयोजक श्री. रितेश गावंडे, श्री. संजय पवनीकर, श्री. भूषण केसकर, श्री. श्रीकांत दुचक्के, श्री. रमेश भंडारी उपस्थित होते.