हिंगणघाट अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षा चालक ठार.
✒️आशीष अंबादे प्रतिनिधि ✒️
हिंगणघाट,दि.31 मार्च:- येथे अज्ञात वाहनाच्याधडकेत एक गरीब रिक्षा चालक घटनास्थळी ठार झाल्याची घटना दि 30 ला रात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर आजंती परीसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 आजंती परीसरात दि 30 ला रात्री 8.15 वाजताच्या सुमारास सायकल रिक्शा चालक नामदेव तुकारामजी भडे वय 55 वर्ष राह. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट हे सायकल रिक्षा घेवुन महामार्गाने जात होते. यावेळी भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहनाने रिक्षाचालकास मागुन जबर धडक दिली. यात रिक्षा चालक नामदेव भडे हा गंभीर जखमी होऊन घटनास्थळी मृत्यु झाला.
ह्या अपघाताची माहिती जाम येथील महामार्ग पोलिस स्टेशनला मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील पोलिस कर्मचारी सुधाकर बावणे, गौरव खरवडे, शरद इंगोले, कांचण नव्हाते, दिनेश धवणे, दिलीप वांदिले हे घटनास्थळी आले. पंचनामा करुन मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासणीकरीता स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. अपघातप्रकरणी पुढिल तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.