हिंगणघाट नगर पालिका प्रशासनाला झाला कोरोना.

50

हिंगणघाट नगर पालिका प्रशासनाला झाला कोरोना.

हिंगणघाट नगर पालिकेकडून कोरोना उपायोजना केवळ नावालाच.

हिंगणघाट नगर पालिका प्रशासनाला झाला कोरोना.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी ✒
हिंगणघाट,दि.1एप्रिल :- वर्धा जिल्हात कोरोना बांधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी कुठलीही प्रभावी यंत्रणा न राबविता लॉकडाऊन व जनता कर्फ्यू आणि संचारबंदी अशा पर्यायांवर नगरलिकेकडून काम केले जात आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात जी प्रभावी यंत्रणा जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने राबवली होती, ती यंत्रणा या टप्प्यात राबविताना हिंगणघाट नगरपालिका प्रशासन दिसून येत नाही. फवारणी तसेच रुग्ण शोधमोहीम देखील केवळ नावालाच ठरत आहे.

वर्धा जिल्हात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 200 ते 500 च्या सरासरीने समोर येत आहे. विशेष म्हणजे अप्रिल 2020 ते आगस्ट 2020 महिन्यांत रुग्णसंख्या कमी प्रमाणात वाढत असतांना हिंगणघाट नगरपालिका प्रशासनाने रुग्ण शोधमोहीम, रुग्णांच्या संपर्कातील आलेल्या नागरिकांचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्रात अधिक लक्ष घालणे अशी प्रभावी यंत्रणा राबविल्यामुळे कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात हिंगणघाट नगरपालिकेला यश आले होते. मात्र, हिंगणघाट नगरपालिकेकडे तीच यंत्रणा असतानादेखील यावेळेस नगरपालिका प्रशासन काहीअंशी अपयशी ठरताना दिसून येत आहे.

हिंगणघाट नगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्राचा विसर
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कोरोना वायरस बांधीत रुग्णांची संख्या वाढल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्राबाबत नियोजन अगदी शुन्य आहे. त्यांच्या कडे कुठलही नियोजन नाही अशी स्थिती सध्या हिंगणघाट शहरांमध्ये दिसून येत आहे. रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर देखील अजूनही नगरपालिका प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

कोरोना वायरस बांधीत रुग्णांच्या संपर्कात येणा-या नागरिकांचा शोध घेण्यास नगरपालीका प्रशासना अपयश आले आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हाभर रुग्ण शोधमोहीम राबविली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी शहरात होताना फारसे दिसून येत नाही.

औषध फवारणीचे काम थंडबस्तात.
हिंगणघाट शहरात औषध फवारणीचे कामदेखील थंडबस्तात गेल आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील गल्लोगल्लींमध्ये फवारणी करण्यात आली होती. मात्र, या टप्प्यात रुग्णसंख्या वाढली असताना देखील अनेक भागांमध्ये अद्यापही फवारणी करण्यात आलेले नाही.

नगरपालिका प्रशासनाकडून कोरोना वायरस बांधीत रुग्ण आढळल्यानंतर संबंधित भागात तत्काळ औषध फवारणी केली जात होती. तसेच मलेरिया विभागाकडून देखील यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. पण आज या सर्व औषध फवारणी बंद करुन हिंगणघाट नगरपालिका झोपली आहे की काय असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

गरिब दुकानदारांची संचारबंदीच्या नावावर लूट.
हिंगणघाट नगरपालिका प्रशासन संचारबंदीच्या नावावर हिंगणघाट शहरांतील गरिब दुकानदारांना जसे हॉटेल वाल्यांना जबरीने हॉटेल ला कुलूप लाऊन सिल करण्याची धमकी देऊन 2000 हजार रुपये माघत असल्याचे समोर येत आहे. मा. जिल्हाधिकारी वर्धा यांनी काढलेल्या आदेशात हॉटेल 9 वाजता पर्यंत सुरु असणार असे नमुद करण्यात आहे आहे. तरी नगर पालिका प्रशासनातले आधिकारी आणि कर्मचारी वर्धा जिल्हाच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचा आदेशाची पायमल्ली करत असतांना दिसत आहे.