एच डी एफ सी बँक शाखा हिंगणघाट विरोधात मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या मार्फत कृषि कर्जदार शेतकऱ्यांनी दिले निवेदन.
✒प्रा. अक्षय पेटकर, प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.1 अप्रैल:- तालुक्यातील वडनेर परिसरातील 40 ते 50 एच.डी.एफ.सी बँक शाखा हिंगणघाट कृषि कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेच्या बोगस कर्ज माफी प्रकरणी एच.डी.एफ.सी बँक शाखा हिंगणघाट विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या मार्फत कृषि कर्जदार शेतकऱ्यांन तर्फे निवेदन देण्यात आले.
वडनेर परिसरात येत असलेल्या 40 ते 50 गावातील शेतकऱ्याला एच.डी.एफ.सी बँक शाखा हिंगणघाटने जास्त कर्जाचे आमिष दाखवून सन 2013 ते 2014 दरम्यान शेत बैंककडे ग्राहाण ठेऊन कर्ज दिले. कर्ज रक्क्म मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांवर जबरस्ती करून पीक विमा आणि जीवन विमा पहिलेच कडून घेतले. या काळात शेती कर्जदार शेतकरी लोकांनी बैंकचे हफ्ते नियमित भरणा केला पण सन 2016 ते 2017 पासून शेतीत सतत नापीकी आणि दुष्काळी परस्थितीमुळे कर्जाचा भरणा करू शकले नाही. म्हूणन बैंकने लोकांच्या घरी जाऊन वसुलीचा तगादा लावला. कर्ज वसूल होत नसल्याने बैंककडून शेतकऱ्यांना परीसरात आणि घरी जाऊन शेतकरी महिलांसोबत अश्लील भाषेत आणि बेजबादार पनांनाने कर्ज भरणा करण्यासाठी वारंवार त्रास देण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज हिंगणघाट शाखेतून घेतले आणि कोर्ट नोटीस मुबंई वरून संपत्ती जप्ती बाबत वारंवार पाठविले पण ज्या शेतकऱ्याकडे कर्ज भरणा करण्यासाठीच पैसा नाहीत तर सामान्य गरीब शेतकरी मुबंई कोर्ट मध्ये जाईल कसा हा पण एक प्रश्न च आहेत. त्यानंतर दोनवेळा सरकारने कर्जमाफी देऊन सुद्धा एच.डी.एफ.सी बँक शाखा हिंगणघाटने शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळ झोकून शेतकऱ्यांना दोन्ही कर्ज माफीची सवलत दिली नाही. हिंगणघाट तालुक्यातील सर्व खाजगी आणि सरकारी बैंकने शेतकऱ्यांना शेती कर्ज माफी दिली, पण या एच.डी.एफ.सी बैंक शाखा हिंगणघाटने कोणत्यानी कर्जदार शेतकऱ्याना कर्ज माफीच्या नियमात बसत असून सुद्धा जाऊन बुजून कर्ज माफी दिली नाही आणि शेतकऱ्यांना कर्ज “भरा नाही तर आत्महत्या करा” अश्या शब्दात वसूल एजेंट कडून कृत करण्यात आले. या वर्षी कोरोना मुळे शेतीचे खूप मोठे नुसकान झाले आणि शेतकऱ्याच्या हाती 90% उत्पन्न आले नसताना आणि शेतकरी कोणतेही कर्ज भरण्यासाठी सक्षम नसताना सुद्धा एच.डी.एफ. सी बँक शाखा हिंगणघाटने शेतकऱ्यांना कोर्टाकडून संपत्ती जप्ती बाबत धमक्या देण्यात येत आहेत. आता शेतकऱ्यांनी आपल्या परिवाराचे पालन पोषण करावे की कर्ज कडून कर्ज भरावे आणि परिवाराला वाऱ्यावर सोडावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्या समोर उभा आहेत. एच.डी.एफ. सी. बँक शाखा हिंगणघाटच्या अति त्रासमुळे शेतकऱ्या समोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही म्हणुन एच.डी.एफ.सी बँक शाखा हिंगणघाट बोगस कर्ज माफी विरोधात मा. मुख्यमंत्री साहेब यांना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या मार्फत कृषि कर्जदार शेतकऱ्यांनी निवेदन देऊन याकडे शासनाने लक्ष देऊन आम्हा सर्व कर्जधारक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी राजू पडवे, वैभव राहाटे, सचिन महाजन, मुकुंद उमरे, अजय शिरसागर, चेतन वटाणे, प्रदीप पडवे, राहुल दूरतकर पत्रकार अमोल झाडे उपस्थित होते.