श्री. हिदायत जमादार यांना, “खादिमे कोकण” आणि “कोकण रत्न” अवॉर्ड.कोकण कमिटी मदिना तर्फे कमिटी चे अध्यक्ष श्री इर्शाद मुकादम यांना शेवटचा निरोप.
✍ रशाद करदमे ✍
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 9075333540 📱
श्रीवर्धन : – श्रीवर्धन येथील प्रख्ख्यात समाज सेवक, आणि संपूर्ण अरब देशात समाज सेवेत आपले नाव गाझविलेले, सौदी अरेबिया मध्ये एकतीस वर्ष सेवा देवून, कोकण आणि कोकणी माणसा चया उन्नती आणि कोकणात सामाजिक जागरुकता निर्माण करणारे श्री. हिदायत जमादार यांना त्याने केलेल्या विविध खेत्रातील सामाजिक काऱ्यांची नोंद घेवून, कोकण कमिटी मदिना तर्फे, “खादीमे कोकण” आणि कोकण काऊन्सिल फाउंडेशन तर्फे “कोकण रत्न” अवर्ड्स मदिना मुनव्वरा येथे प्रदान करणेत आले. श्री. हिदायत जमादार याने हे अवॉर्ड श्रीवर्धन मधून ऑनलाईन येवून स्वीकारले आणि कोकणी माणसाने एकामेकाला सहकार्याची भूमिका आणि आपली मन नेहमी साफ निय्यत ठेवून समाज कार्य करत रहावे असे निरोप दिले.
सौदी अरेबिया स्तित मदीना शहरात कोकण कमिटी मदीना चे अध्यक्ष श्री. इर्शाद मुकादम (दापोली ) यांना अखेरचा निरोप देण्यात आला. श्री. इर्शाद मुकादम हे नोकरी निमित्त गेली १९ वर्ष सौदी मध्ये स्थायिक होते व आता आपल्या मायदेशी परतत आहेत. २०१० ते २०२२ अशी लगातार ११ वर्ष त्यांनी कोकण कमिटी मदीना चे अध्यक्ष पद भूषविले. त्यांच्या अध्यक्षते खाली विविध कार्यक्रम राबविण्यात आले. जसे संपूर्ण जगातील कोकणी बांधव जे तीर्थ यात्रे करिता मदीना ला जातात त्यांच्या साठी बिना मूल्य राहण्याची सोय गेली १० वर्ष करण्यात आली तसेच गेली १० वर्ष पवित्र रमझान महिन्यात इफ्तार ( रोजा सोडणे) तसेच सहरी ( रोजा पकडने) साठी लगातार ३० दिवस अंदाजे १०० ते १२५ लोकांची मोफत भोजनाची व्यवस्था करणे तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे व जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशातून आलेल्या कोकणी बांधवांना वाट्टेल ती मदत करण्यात कोकण कमिटी मदीना नेहमी अग्रेसर असते.
कोकणातील जे लोक नोकरी निमित्त मदीना अथवा अन्य ठिकाणी गेले असता काही अडचणी आल्यास मदीना कमिटी ने नेहमी त्यांच्या अडचणींचे निवारण केले. कोणीही कोकणी जर मदीना मध्ये गेले असता जर दगावले तर संपूर्ण कागदो पत्री कारवाही करून दफन विधी करण्याचे काम ह्या कमिटी ने गेली कित्तेक वर्ष सांभाळले. ह्या सगळ्या कामात कमिटी चे अध्यक्ष श्री. इर्शाद मुकादम यांचा सिंहाचा वाटा असे. त्यांच्या कामाची दखल घेत कोकण कमिटी मदीना तर्फे त्यांना *खादिमे कोकण* ह्या पुरस्काराने नवाजण्यात आले. ही पदवी मदीना मस्जिद ए नबवी चे शेख मुझफ्फर ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
त्याच बरोबर कमिटी चे माझी कार्यकर्ते श्री. हिदयातुल्लाह जमादार (श्रीवर्धन) यांना “खादिमे कोकण” ह्या पदवी ने नावाजण्यात आले ही पदवी श्री. इर्शाद मुकादम ह्यांच्या हस्ते देण्यात आली. आणखी काही कार्यकर्ते श्री. नदीम अलवी तसेच श्री. सादिक मुकादम यांना ही ह्या पदवीने नावजन्यात आले ह्या साऱ्या पदव्या सध्याचे अध्यक्ष श्री. इर्शाद मुकादम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. शिवाय कोकण काऊन्सिल फाऊंडेशन तर्फे श्री. हिदातातुल्लाह जमादार यांना कोकण रत्न ह्या पुरस्काराने नावजण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. मुजिबुल्लाह दुस्ते तसेच श्री. सलमान बोट ह्यांच्या तर्फे करण्यात आले. कर्यकमाची सर्वात कुराण पठणाने झाली ही श्री. अब्दुल्ला काद्री यांनिं केली.
कमिटी चे अध्यक्ष श्री. इर्शाद मुकादम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अल्लाह चे आभार मानून आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांना तसेच आपल्या पत्नी व मुले तसेच आपल्या कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांना देत भावूक मनाने सर्वांचा निरोप घेतला. व ह्या पुढे ही अशीच लोकांची सेवा करण्याचे सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाला उपस्थित लोकांनी श्री. इर्शाद मुकादम यांच्या कामाची भरभरून स्तुती केली.
कार्यक्रमाची सांगता श्री. मुजीबुल्लाह दूस्ते यांनी आपल्या बहुमूल्य भाषणाने केली.
आपण सगळे एकत्र मिळून आपल्या कोकण साठी नेहमी झटत राहावे हीच अल्लाह जवळ प्रार्थना करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
परदेशात स्थायिक असूनही आपल्या माय भूमी बद्दल चे हे प्रेम व इथल्या लोकांबद्दल ची आपुलकी चे जगभरातील लोकांकडून कोकण कमिटी मदीना च्या कार्यकर्त्यांवर स्तुती सुमने उधळण्याचा आली.
कोकण कमिटी मदीना तसेच इतर कोकणी कमिटी ला आमचा सलाम.