गणपति वप्प मोरियं” महानाट्याचे पोस्टर लॉंच सोहळा संपन्न

गणपति वप्प मोरियं” महानाट्याचे पोस्टर लॉंच सोहळा संपन्न

गणपति वप्प मोरियं" महानाट्याचे पोस्टर लॉंच सोहळा संपन्न

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार ,माता रमाबाई आंबेडकर मार्ग येथे काल संध्याकाळी ६ :३० वाजता ‘गणपति वप्प मोरियं’ नाटकाचा पोस्टर लॉंच सोहळ दिमाखात संपन्न झाला. बौ.पं.स.शाखा.क्र.१६ सेक्रेटरी दीपक जाधवजी,या नाटकाचे दिग्दर्शक आणि नेपथ्यकार अरुण कदम सर, मैत्रेय संघाचे सरसंघचालक आणि या नाटकाचे लेखक बाळासाहेब थोरात सर आणि सिद्ध आर्टच्या निर्मात्या पूनम पवार यांच्या हस्ते या पोस्टर चे अनावरण झालं.अतिशय सुंदर अशा या पोस्टरचे डिझाईन केले आहे ते महेश कांबळे सरांनी.नाटकातील गाण्यांना संगीतबद्ध केलंय ते प्रविण डोणे दादा आणि प्रितेश मांजलकर यांनी .या नाटकाच्या पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजनेची धुरा सांभळताहेत अक्षय धांगट. रंगभूषा उदयराज तांगडी यांची असेल.आपल्या कामाप्रती अतिशय प्रामाणिक असणाऱ्यांची भट्टी छान जमून आली आहे.नाटक ही अतिशय सुंदर होणार याची शाश्वती आहेच. *पहिला प्रयोग शनिवार दि.९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता रविन्द्र नाट्यगृह,प्रभादेवी इथे होणार आहे.* नक्की या भारतीय इतिहासातील सोनेरी काळ रंगभूमीवर अवतरणार आहे.. ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा!
*गणपति वप्प मोरियं*
तिकिटासाठी संपर्क- Yugant Katkhade 9833846191