नूतन संवत्सर विशेष शके १९४४

नूतन संवत्सर विशेष
शके १९४४

नूतन संवत्सर विशेष शके १९४४

✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308326855,8799840838

आपणा सर्वांना शनिवारी दि. 2 एप्रिल 2022 रोजी पाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

या शुभ दिनी आपण सर्व हिंदू बांधव आपापल्या घरी गुढ्या तोरणे उभारतो व आपल्या पवित्र हिंदू नूतन वर्षाचे स्वागत करतो.! मागच्या कटू आठवणी विसरून मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतो.
मित्रांनो ! मनात कुठलीही शंका न घेता शक्य असेल तिथे कुठल्याही दिशेला जमेल तशी गुढी उभारा ! गुढीची पूजा करताना “ब्रह्मध्वजाय नमः।” असे म्हणावे !
नंतर खालील मंत्र म्हणावा.
ब्रह्मध्वज नमस्ते$स्तु सर्वाभीष्ट
फलप्रद ।
प्राप्ते$स्मिन्वत्सरे नित्यं
मद् गृहे मंगलं कुरू ।।

– हे ब्रह्मध्वजा ! तुला मी श्रद्धेने नमन करतो. मला इच्छित फलांचा लाभ होऊ दे आणि या नवीन वर्षात माझ्या घरी मंगलमय वातावरण सदोदित राहो.

माझ्या सर्व हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो! येणाऱ्या पाडव्यापासून “शुभकृत” नाम संवत्सर सुरू होणार असून शालिवाहन शक हे “1944” आहे.! या अंकाची बेरीज 18 येते व एकक बेरीज ही “9” येते. म्हणजेच येणाऱ्या नूतन संवत्सरावर “9” या अंकाचे प्रभुत्व असणार आहे. 9 म्हणजे “धनु” राशी असून या वर्षी “गुरु””या ग्रहाचे प्राबल्य दिसून येणार आहे.! हे संवत्सर सर्वांना अतिशय सकारात्मक जाणार आहे.! या संवत्सरात सर्वात प्रभावी राशी – वृषभ, मिथुन, सिंह, वृश्चिक, धनु, कुंभ, मीन आहेत.!!!

संवत्सराचे मिळणारे फल
या संवत्सराचा राजा हा “शनि” व प्रधान हा “गुरु” आहे .

मेदनीय ज्योतिष व वैज्ञानिक दृष्टीने जगात मोठ्या घडामोडी घडून येतील. भूगर्भातील हालचाली वाढून मोठे भूकंप, उत्पात होतील. ज्वालामुखी, अग्नितांडव वादळ-वारे , रोगराई , दुष्काळ, युद्धे, अवर्षण अशा संकटामुळे जैविक व वित्तीय हानी प्रचंड प्रमाणात होईल.
खऱ्या अर्थाने हा काळ मोठ्या परीक्षेचा असेल ! प्रचंड उष्णतेचे हे वर्ष, हिमकडे वितळणे, भूस्खलन होणे, कडे कोसळणे या घटना घडून पर्यावरण व्यवस्था कोलमडून पडेल. अतिवृष्टी, पूर यामुळे हाहाःकार माजेल. समुद्रात त्सुनामीचा कहर होईल. जगापुढे अनेक समस्या निर्माण होतील.

राजकीय स्थित्यंतरे घडतील.
मोठी सत्तांतरे घडण्याची परिस्थिती निर्माण होईल. काही ठिकाणी चमत्कारिक सत्ता पालट होतील.
ज्या राजकीय लोकांची राशी व लग्न सिंह, तूळ, वृश्चिक, कुंभ, मीन, आहे त्यांच्यावर याचे विशेष प्रभाव दिसून येतील.
जे राजकारणी सात्विक, अध्यात्मिक व लोकहितकारी वृत्तीचे असतील त्यांचे महत्त्व वाढीस लागेल. त्यांचा प्रभाव या संवत्सरात प्राकर्षाने दिसून येईल.
काही लोकांची अनुचित कर्मे उघडकीस येतील. अनैतिक काम व भ्रष्टाचार करणाऱ्यांची कारस्थाने बाहेर निघतील. पोलीस-चौकशी, व
न्यायालयाचा ससेमिरा मागे लागेल. शिक्षा भोगावी लागेल.

या संवत्सरात सामान्य व सज्जन सरळमार्गी धार्मिक लोकांना मात्र हे वर्ष चांगलेच जाणार !
मनाची कुचंबणा कमी होईल.! आनंदाचे मोकळे श्वास घेता येतील. या वर्षात दुष्ट लोकांची कारस्थाने उघडी पडतील. घातपात,चोरी, दरोडे, हत्या यांचे प्रमाण वाढीस लागेल. जे लोक सतत प्रसार माध्यमातील गोष्टीकडे लक्ष देतील त्यांना त्या नकारात्मक बातम्यामुळे बुद्धीभेद होत राहील. यामुळे मानसिक रोग तसेच नकारात्मकता समाजात वाढत राहील.

या संवत्सराचा राजा “शनी” व प्रधान “गुरू” या दोघांचेही कार्य मंद व सात्विक असल्याने प्रजेमध्ये स्थिरता दिसून येईल. या येणाऱ्या वर्षात संवत्सराचा मंत्री-गुरू, मेघस्वामी–बुध, रसाधिपती- चंद्र, रब्बीचा स्वामी शुक्र, नंदसारी नावाचा नाग, पशुपालक- बलभद्र आहे. पाऊस मुबलक पडेल.लोक समाधानी होतील. धन धान्य,वस्तू, संपत्ती, फुले, फळे यांची वाढ होईल. शेतीतील उत्पन्न वाढेल.!! “संवर्त” नावाचा मेघ असल्याने
काही ठिकाणी धार्मिकता कमी होऊन तमोगुणी प्रजेत कामूकता वाढीस लागेल.
या वर्षी 22 जून 2022 रोजी बुधवारी सकाळी 11-42 वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्री प्रवेश करून मुबलक पर्जन्य घेऊन येईल. धनधान्य वृद्धी व रोगनाश होईल. तसेच धार्मिक वातावरण निर्माण होईल. गाईचे व गोमूत्राचे महत्त्व खूप वाढेल. धनधान्य व दूधदुभते भरपूर होईल.

नूतन संवत्सर राशी भविष्य व राशींचे आय-व्यय साधन
येणाऱ्या संवत्सरातील प्रत्येक राशीचे लाभ व खर्च याचे कोष्टक पंचांगात दिलेले असते. पाडव्याच्या दिवशी पंचांग वाचणारे गुरूजी प्रत्येक राशीचे
आय-व्यय वाचतात.