वृद्ध शेतकऱ्याने मुलाच्या नोकरीसाठी गमावली जमापूंजी, कर्मचारी निघाला फ्रॉड

वृद्ध शेतकऱ्याने मुलाच्या नोकरीसाठी गमावली जमापूंजी, कर्मचारी निघाला फ्रॉड

वृद्ध शेतकऱ्याने मुलाच्या नोकरीसाठी गमावली जमापूंजी, कर्मचारी निघाला फ्रॉड

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
9421808760

मुंबई : मंत्रालयात कामकाजासाठी फेऱ्या सुरु असताना, एका वृद्ध शेतकऱ्याला एक तरुण वाटेतच गाठतो. मुलाला गृह विभागातून एसआरपीएफमध्ये नोकरी देण्याचे स्वप्न दाखवतो. आपल्या मुलाच भल होत आहे तर, गावातल्या आणखी काही तरूणांना नोकरी मिळवून देण्याची विनंती हा शेतकरी करतो. पुढे १६ लाख रुपयांमध्ये शेतकऱ्याच्या मुलासह चौघाच्या नोकरीसाठीचा व्यवहार ठरतो. महिनाभरातच, ‘हॅलो मी गृह खात्यातून बोलतोय. तुमच्या मुलाच्या नोकरीची ऑर्डर निघाली आहे.’ असा कॉल येताच ७० वर्षीय शेतकरी मुलासह मंत्रालय गाठतो. तेथे, महाराष्ट्र शासन लिहिलेल्या पांढऱ्या कारमधून त्यांना मंत्रालयात नेले जाते. मात्र, नोकरीची ऑर्डर कॉपी मिळण्यापूर्वी नांदेडच्या शेतकऱ्यावर पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ ओढवली आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळचे नांदेडच्या हिब्बट गावातील रहिवासी असलेले शेतकरी शंकर गणेशराव मुंढे (६७) यांची यामध्ये फसवणूक झाली आहे. मुंढे यांनी २०१३ मध्ये पोलीस पाटील तर, २०१८ ते २०२० पर्यंत हिब्बट गावाचा सरपंच म्हणून काम केले आहे. सध्या ते शेती बरोबर एक आश्रमशाळा चालवत आहेत. याच आश्रमशाळेला अनुदान मिळावे यासाठी मंत्रालयातील समाजकल्याण विभागात त्यांची ये-जा सुरु होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नेहमीप्रमाणे ते कामासाठी मंत्रालयात गेले असताना एक तरुण त्यांच्याकडे आला. त्याने त्याचे नाव �