नांदेड शहरातील सर्व रस्ते गुळगुळीत करा!

नांदेड शहरातील सर्व रस्ते गुळगुळीत करा!

नांदेड शहरातील सर्व रस्ते गुळगुळीत करा!

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
9421808760

नांदेड : एक एप्रिलपासून जिल्ह्यात सर्वत्र हेल्मेटसक्ती केल्यामुळे सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गुरुतागद्दी सोहळ्यानिमित्त नेदरलॅंडच्या धर्तीवर अरुंद रस्ते शहरात तयार करण्यात आले. परंतु, या रस्त्यांवर खड्डे पडल्याने छोटे-मोठे अपघात तर होतच आहेत, शिवाय दुचाकी चालकांना मणक्याच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पहिले रस्त्यावरील खड्डे बुजवा नंतरच हेल्मेट सक्ती करावी, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून समोर आल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी अचानक बुधवारी (ता.३०) हेल्मेटसक्तीचे आदेश काढून त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दुचाकी चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. उन्हाळ्यात शहराचे तापमान ४० ते ४१ अंशाच्या आसपास असते. अशावेळी हेल्मेट घालून अजून त्रास करून घ्यायचा का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील काही प्रमुख मार्गावर सिग्नल आहेत. या ठिकाणी उन्हातदेखील एक-दोन मिनिट थांबावे लागते. त्यामुळे किरकोळ आजारामुळे आधीच त्रस्त झालेल्या नागरिकांना या सक्तीमुळे त्रास वाढू शकतो.

रामेश्वर गुंडे म्हणतात, की शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी चार वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी रस्ते गुळगुळीत राहतील, नागरिकांना त्रास होणार नाही, अशी हमी दिली होती. परंतु, महापालिकेची निवडणूक नऊ महिन्यावर आल्यानंतर दिडशे कोटी रुपयांचे विकास कामे सुरु केली आहेत. त्यामुळे नऊ