सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरातील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरातील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरातील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
9421808760

नांदेड : -सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात पालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाची संयुक्तपणे धडक कारवाई.किरकटवाडी – सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात पालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाने

संयुक्तपणे धडक कारवाई करत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी अतिक्रमणे जेसीबी मशीनच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. दरम्यान कारवाईतून जेवढे वाचवता येईल तेवढे साहित्य वाचविण्यासाठी व्यावसायिकांची धावपळ सुरू होती तर पालिकेच्या वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले होते.

अतिक्रमण व बांधकाम विभागाने संयुक्तपणे केलेल्या सदर कारवाईत दुकांच्या पुढे बांधण्यात आलेले अनधिकृत पत्रा शेड, टपऱ्या, नामफलक व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नांदेड फाट्याजवळ अगोदरच रस्ता अरुंद असल्याने व त्यातच पालिकेची वाहने रस्त्यात उभी असल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने वाहनचालक व प्रवासी संताप व्यक्त करताना दिसत होते.

कारवाई सुरू असताना पालिकेच्या अतिक्रमण विभागातील निरीक्षक धम्मानंद गायकवाड, बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता निशिकांत छापेकर, धनंजय खोले व इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता.

नांदेड फाट्यावर कारवाई; किरकटवाडी-खडकवासल्यात पळापळ

नांदेड फाट्याजवळ सुरू असलेली अतिक्रमण कार�