१ एप्रिलपासून काय होणार महाग, कुठे लागणार तुमच्या खिश्याला कात्री

58

१ एप्रिलपासून घरगुती वस्तूंपासून ते प्रॉपर्टी खरेदी यासाठी सामान्य माणसाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत

१ एप्रिलपासून घरगुती वस्तूंपासून ते प्रॉपर्टी खरेदी यासाठी सामान्य माणसाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत

मनोज कांबळे
१ एप्रिल,२०२२: आधीच महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यात इंधनाचे दर, गॅस सिलेंडरचे दर आणि खाद्यपदार्थाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. आधीच कोरोनामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था, रशिया-युक्रेन युद्ध यांमुळे निर्माण झालेल्या पुरवठा साखळीच्या अनेक समस्यां आणि चुकीची सरकारी धोरणे यांमुळे सुरु होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात महागाई अजून वाढतच जाणार आहे. १ एप्रिलपासून घरगुती वस्तूंपासून ते प्रॉपर्टी खरेदी यासाठी सामान्य माणसाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. १ एप्रिलपासून काय होणार महाग? चला पाहू.

– १ एप्रिलपासून खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. यामध्ये अंडी,मांस,दूध यांसारख्या पदार्थांचा समावेश असेल. त्याचबरोबर गरमीच्या महिन्यांतून जास्त प्रश्न केल्या जाणाऱ्या कोका-कोला आणि पेप्सी सारख्या शीतपेयांच्या किमती देखील वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

– एप्रिल-मे महिने हे भारतामध्ये लग्न आणि घरगुती समारंभाचे महिने असतात. यादरम्यान कपड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. १ एप्रिलपासून कपड्यांच्या किमतीतमध्ये देखील वाढ होणार आहे. विविध कपडे निर्मिती व्यवसायाचा अभ्यास करणाऱ्या संस्थांच्या निरीक्षणानुसार कपड्यांच्या किमती जवळपास ३ – १० टक्क्यांनी वाढणार आहेत.

– १ एप्रिलपासून हॉटेल मधले जेवण होणार महाग. खाद्यतेलांचे वाढते दर, व्यावसायिक सिलेंडरचे वाढते दरामुळे हॉटेल व्यावसायिकांवर अतिरिक्त ताण पडत आहे. आधीच कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय मंदीत अडकल्याने व्यवसायात टिकून राहण्यासाठी हॉटेल मालकांनी हॉटेलच्या मेनू दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे.

 

या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?

 

– १ एप्रिलपासून घर खरेदी देखील महाग होणार आहे. १ एप्रिलपासून पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यास कलम 80EEA अंतर्गत कर सवलतीचा लाभ देणे मोदी सरकारने बंद केले आहे. यांमुळे सर्वसामान्य भारतीयांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न महागणार आहे.

– मोदी सरकारकडून १ एप्रिलपासून अल्युमिनियम धातूवर ३० टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या धातूचा वापर होणाऱ्या टीव्ही, फ्रिज आणि एसी सारख्या वस्तूंची किमतींत आधी हॊणार आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये लागणाऱ्या प्रिंटेज सर्किट बोर्डवरही कस्टम ड्युटी लागू केल्याने सामान्य नागरिकांना मोबाईल खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

https://www.instagram.com/p/CbwqIVMuLAW/