रामनवमीची मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या दोन कुटुंबांमध्ये वाद

त्रिशा राऊत

नागपुर ग्रामीण प्रतिनिधी

मो 9097817953

नागपुर – रामनवमीच्या दिवशी शहरामनवमीची मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या दोन कुटुंबांमध्ये वाद झाल धक्कादायक घटना समोर आली आहे. हा वाद इतका मोठा होता की तो हाणामारीपर्यंत पोहोचला.त्याचवेळी धक्काबुक्कीमुळे एक महिला गंभीर जखमी झाली, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी तीन महिलांसह एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच हे चार जण बेपत्ता झाले.पोलिसांनी या आरोपींच्या मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून, त्या आधारे पोलीस या तीन महिलांसह अन्य व्यक्तींचा शोध घेत आहेत.

धंतोली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फॉर्च्युन मॉलच्या पायऱ्यांवर रामनवमीनिमित्त झांकी पाहण्यासाठी आलेली महिला कुटुंबासह बसली होती. ही महिला आजारी असल्याने ती जिन्यावर आराम करत होती.या आजारी महिलेला 3 महिलांसह एकाने धक्काबुक्की करून मारहाण केली. ढकलल्यानंतर तोल गेल्याने ही महिला पायऱ्यांवरून खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. संतोषी रामकिशोर बिनकर ,(बालाजीनगर, मानेवाडा )असे मृत महिलेचे नाव आहे. संतोषी मेडिकल कॉलेजमध्ये हेड नर्स म्हणून कार्यरत होत्या.पोलिसांनी 4आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्यात या तीन आरोपी महिला दिसल्या आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच आरोपी व्यक्तीसह या तिन्ही महिला बेपत्ता झाल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेल्या सुगावाच्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या महिलांबाबत काही माहिती असल्यास तत्काळ धंतोली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here