सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर.
✍️रोहित शिंदे ✍️
पेण तालुका प्रतिनिधी
📞 96898 35499📞
पेण :-सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत असुन लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे तसचे डांबर मशिन जवळ सीएनजी पंप आहे आणि हे खुप धोकादायक असून यावर कारवाई होण्यासाठी वरमवार पाठ-पुरावा करुन देखील कुठल्याही प्रकारची दाद मिळत नसल्यामुळे दिनांक ०१/०४/२०२४ रोजी तहसिलदार अधिकारी व पोलिस निरीक्षक याची भेट घेऊन उपोषणाचा अर्ज दाखल केला.
सदर प्रकरणी तहसिलदार अधिकारी व नायब तहसिलदार अधिकारी यांना पुराव्यासोबत सर्व प्रकार सांगुन देखील सदर अधिकारी कारवाई होईल करू असे बोलत आहेत परंतु कोणतीही कारवाई करत नसुन सदर प्रकरणा वरती पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत जनते समोर आणणार आणि तहसील व इतर संबंधित सहबागी अन्य अधिकारी कश्या प्रकारे कारवाई साठी टाळाटाळा कश्या प्रकारे करत आहे हे जनतेसमोर आणणार असे सांगितले.
पुढील १० दिवसात 1) सुरू असलेले प्रदूषण थांबले पाहिजे 2) सदर मशीन कायम स्वरूपी बंद झाल्या पाहेज 3) ग्रामसेविका व तहसीलदार यांनी सदरचा प्रकरणावर कोणतीही कारवाई का केली नाही याची सखोल चौकशी करून तत्काळ निलंबिनाची कारवाई करावी . अशी मागणी केली व तसे न झाल्यास मी ३ महिनाची ग्रभवती असुन माझ्या २ वर्षाचा मुला सोबत पेण तहसीलदार अधिकारी यांच्या दालनात आमरण उपोषणास बसणार असा ईशारा दिला.