आदिवासीे धुर्वे कुटुंबाने घेतली धम्मदिक्षा

आदिवासीे धुर्वे कुटुंबाने घेतली धम्मदिक्षा

आदिवासीे धुर्वे कुटुंबाने घेतली धम्मदिक्षा

आदिवासीे धुर्वे कुटुंबाने घेतली धम्मदिक्षा

🖋️ मयुर डांगे,
चंद्रपूर प्रतिनिधी
📱 9764643249

चंद्रपूर : 1 एप्रिल
चंद्रपूर शहरात स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन असलेली दीक्षाभूमी येथे आदिवासी धुर्वे कुटुंबाने बौध्द धम्माची दिक्षा घेऊन बौध्द धम्मात प्रवेश घेतला. धम्म दिक्षेचा कार्यकार्यक्रम शनिवार ला पार पडला.
बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौध्द महासभा संघटनेचे जिल्हा सचिव संस्कार विभाग व प्रशिक्षित बौध्दाचार्य कृष्णाक पेरकावार यांच्या तर्फे धम्मदिक्षा देण्यात आली. जगन महासिंग धुर्वे, अंजू जगन धुर्वे, अर्जुन जगन धुर्वे, आरती जगन धुर्वे अशी धम्मदिक्षा घेणार्‍यांची नावे आहेत. बावीस प्रतिज्ञा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी नेताजी भरणे, कैविष मेश्राम, मंदाकिनी दुधे, भिमलाल साव, अशोक पेरकावार, सपना कुंभारे, सुजाता लाटकर, उज्वला तोडेकर, पंचशिला वेल्हे, कविता अलोने, यशवंत मुंजनकर, सुनिता नगराळे, श्रुती भारती, पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष किशोर तेलतुंबडे यांची उपस्थिती होती.