दोन ट्रकची समोरा समोर भीषण धडक, चालक जागीच ठार

दोन ट्रकची समोरा समोर भीषण धडक, चालक जागीच ठार

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

गडचिरोली : ३१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता धानोरा-मुरुमगाव मार्गावरील बेलगाव जवळील वळणावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन एक चालक जागीच ठार झाला तर दुसरा किरकोळ जखमी आहे.
चलोपती (४८, रा. देवलाही, बंगळुरू, कर्नाटक) असे मृत चालकाचे नाव आहे. मनोज साकेत (२७, रा. सिंगरोली मध्य प्रदेश हा चालक जखमी आहे. मुकुटबन येथून डोलामाईट गिट्टी भरून ट्रक धानोराकडून मुरूमगावमार्गे रायपूर येथे जात होता, तर मृताचा ट्रक मुरूमगावहून धानोराकडे जात होता. सकाळी आठ वाजेच्या सुमारास धानोरा-मुरूमगाव मार्गावरील बेलगाव आमपायली गावाच्या मध्ये वळणावर दोन ट्रकची भीषण धडक झाली. यात समोरील भाग क्षतिग्रस्त झाला. जेसीबीद्वारे वाहने हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.