आयसोलेशन हॉस्पीटल परिसरामध्ये केंद्रीय औषधी साठवणूक केंद्र जाणार साकारले
✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098
नागपूर :- सविस्तर बातमी याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिकेद्वारे आयसोलेशन हॉस्पीटल परिसरामध्ये केंद्रीय औषधी साठवणूक केंद्र साकारले जाणार आहे. या प्रस्तावित कार्यासंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता.१) इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पीटल परिसराची पाहणी केली व आवश्यक सूचना नोंदविल्या.
यावेळी उपायुक्त श्री. विजय देशमुख, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, धंतोली झोनचे सहायक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, श्री. अजय पाटील, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शीतल वांदिले, उपअभियंता श्री.राजीव गौतम, आयसोलेशन हॉस्पीटलच्या प्रभारी डॉ. मेघा जैतवार, भांडार प्रभारी श्री. पृथ्वीसिंग राठोड, आर्कीटेक्ट श्री. त्रिलोक ठाकरे आदी उपस्थित होते.