कुंडलिकेच्या खाडीत रंगला शिडाच्या होड्यांचा थरार, आग्रावच्या पंकज शेट्टीकोळी यांची हिरकणी होडी प्रथम

कुंडलिकेच्या खाडीत रंगला शिडाच्या होड्यांचा थरार, आग्रावच्या पंकज शेट्टीकोळी यांची हिरकणी होडी प्रथम

रत्नाकर पाटील, रायगड ब्यूरो चीफ

‎मो: ९४२०३२५९९३

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

अलिबाग: खवळलेला अरबी समुद्र उचलणाऱ्या लाटांवर स्वार होत रेवदंड्याच्या कुंडलिकेच्या खाडीत शीडवाल्या होडीच्या शर्यतीचा थरार सोमवारी अनुभवता आला निमित्त होते शीडवाल्या होड्यांच्या शर्यतीचे. प्रति वर्षाप्रमाणे दर्या सागर मित्र मंडळ पूर्वपाडा आग्राव आयोजित शिड वाल्या हो स्पर्धेला परिसरातील हजारो क्रीडाप्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला .

‎आग्राव जेटी येथून दुपारी बारा वाजता शिड वाल्या होडीच्या शर्यतीला प्रारंभ झाला या शीड वाल्या होडीची स्पर्धा ओएनजीसी ने पुरस्कृत केली होती. या स्पर्धेचा प्रारंभ ओएनजीसीचे अधिकारी विवेक सिंह चंद यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी प्रतोद अँड .आस्वाद पाटील, जिल्हा परिषद माजी सभापती चित्रा पाटील यांच्या हस्ते निशान दाखवून तसेच फटाक्याच्या आवाजाने करण्यात आला. यावेळी अलिबाग मुरुड मतदार संघातील आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या वेळी ओएनजीसी चे अधिकारी, पंकज शेट्टी कोळी,संदीप घरत, उमेश मोरे, आनंद गोधळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‎आग्राव येथे या शिडच्या होडीच्या शर्यतीत आग्राव, रेवदंडा,कोरलय, थेरोंडा, साळाव आधी परिसरातील यांत्रिक होड्यांची जत्रा पाहावयास मिळाली. या यांत्रिक होड्यातून कोळी बांधव व भगिनीसह पाहुंणे यांनी मौजमजेचा आनंद लुटला.

‎या स्पर्धेमध्ये राजेंद्र आधिकारी यांची पद्मावती, हरिश्चंद्र पाटील यांची जयंवती, अभिजीत अधिकारी यांची लक्ष्मी , पंकज शेट्टीकोळी यांची हिरकणी, सुरज पाटील यांची हिरावती, दिनेश मिस्त्री यांची वसुंधरा, संजय पाटील यांची कमळावती , आम. महेंद्र दळवी यांची महालक्ष्मी प्रसन्न अशा आठ शिडवाल्या होड्यांनी सहभाग घेतला होता.

‎शिडवाल्या होड्यांच्या या स्पर्धेत स्पर्धेमध्ये आग्राव चे पंकज शेट्टी यांची हिरकणी होडीने प्रथम मिळविला, कोरलेयच्य्या संजय पाटील यांची कमलावती होडी द्वितीय, आग्राव मधील गुरुनाथ पाटील यांची हिरावती होडी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरली. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रुपये 75000 व भव्य चषक, द्वितीय क्रमांक 51 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांक 31 हजार रुपये भव्य चषक, आणि उत्तेजनार्थ बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

‎आजकाल इंजिनच्या होड्या वापरात येत असून शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या आहेत. शिडाच्या होड्यांची परंपरा जपण्यासाठी रायगड जिल्ह्यातील आग्राव गावात शिडाच्या होड्यांची स्पर्धा होऊन ही परंपरा येथील कोळीबांधव जपत आहेत. – चित्राताई पाटील, माजी राजिप सभापती

‎पूर्वांपार गुढीपाडव्याची परंपरा जपत आग्राव कुंडलिका समुद्र खाडीत शिडांच्या होड्यांची रंगतदार स्पर्धा होत असते. महिला, थोर, लहान, कोळी बांधवांचा उत्साह गगनात मावेनासा होत असतो. या उत्सवाच्या निमित्ताने सर्व कोळी बांधव आनंद साजरा करत असतात. – ‎पंकज शेट्टी कोळी, आग्राव