अखेर कोरोनातून सावरण्यात गोवरी गावाला यश तालुक्यात बनला होता हॉटस्पॉट गाव.
माजी उपजिल्हा प्रमुख बबनभाऊ उरकुडे यांच्या अथक प्रयत्नाने अखेर खुलले गावाचे दरवाजे.

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा:- तालुक्यात कोरोनाचा हाहाकार चालू आहे दिवसागणिक 100-150 कोरोनाबाधित होत असून पूर्णपणे प्रशासन त्याच कामात व्यस्थ आहे.
तालुक्यात असाच एक हॉटस्पॉट ठरलेल्या गोवरी गावाने मात्र कोरोनाला हद्दपार केले आहे.
जिकडे तिकडे गोवरी गावाचीच चर्चा होत असताना गावातील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाणे 17,18,19 आणि 24 एप्रिलला टेस्टिंग कॅम्प घेण्यात आले यामध्ये जवळपास 350 लोकांची टेस्टिंग करून यामध्ये 64 कोरोनाबाधित निघाले होते. अतिशय चिंताजनक अशी स्थिती असताना गावच्या सरपंच्या सौ आशाताई उरकुडे यांनी ऍकशन प्लॅन वर काम करून गावातील आरोग्य सेविका गाडगे मॅडम, आशा वर्कर्स आशा झाडे, हेमलता इटणकर यांच्या मदतीने गावात चेस द वायरस राबवून अखेर गावाची वाट खुलली आहे. कोरोनाबाधिताना वेळोवेळी धीर देत आसोलेशनला जाऊन त्यांना खोकल्याची औषध वाटप करणे फळांचे वाटप करणे यामाध्यमातून सरपंच्यांनी गावाला धीर दिला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्वाची भूमिका ठरली असेल तर ते म्हणजे तहसीलदार गाडे साहेब, गटविकास अधिकारी डाँ. रामावत साहेब, डाँ नगराळे साहेब डाँ दुघे साहेब, सुरेश कुंभारे आणि सर्व ग्रा सदस्यांनी परिश्रम घेतले.
आज घडीला 14 दिवसापासून गावात एकही कोरोनाबाधित नाही याचा सगळीकडे आनंद व्यक्त होत आहे. राष्ट्र पुरुष संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्याने गावात जाण्याचे सर्व मार्ग खोलून गावाने एक आदर्श निर्माण केला आहे. याच गोष्टीचे समाधान व्यक्त करत असताना गावचे नेते शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बबन उरकुडे यांनी हा सर्व गावकरी आणि तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा विजय असून आम्हाला समाधान असल्याच मत व्यक्त केलं.