भद्रावती शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधील आता कोरोना पॉझिटिव्ह साठी ओपीडी निशुल्क.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर(भद्रावती):- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने जनजिवन विस्कळीत झाले आहे. एकीकडे जिल्ह्यात वाढलेल्या कोरोणा विषाणुच्या प्रादुर्भावाच्या परीस्थितीत अनेक वाईट व दु:खद घटना समोर येत असल्या तरी रूग्ण व नातेवाईकांना सुखावणा-या काही विशेष घटना देखील घडत आहेत.
भद्रावती तालुक्यात भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोणा विषाणुबाधित व ईतर रुग्णांकरीता वैद्यकीय सुविधा गेल्या महिनाभरापासून सुरु आहेत.
या उपक्रमांतर्गत श्री मंगल कार्यालय येथे कोविड केअर सेंटर उभारुन ते प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. या सेंटरमधे निशुल्क उपचार व भोजन व्यवस्था, ऑक्सीजन, सॅनिटायजरसह आरोग्य विषयक सेवा पुरवून आवश्यक औषधीसाठा सुध्दा पुरविला जात आहे. मागणीप्रमाणे कोविड सेंटरला ईतर आवश्यक त्या सेवा पुरवीणे अविरत सुरु आहेत. अनेक रूग्ण या निशुल्क कोविड सेंटरचा लाभ घेत आहेत. हेल्पलाईन व्दारा वैदयकिय सल्ला व त्रस्त रुग्णांना तात्काळ चंद्रपुर जिल्ह्यातील रुग्णालयामधे दाखल करुन घेण्यासाठी मदतकार्य सुरु आहे. अशातच आता शिंदे मल्टीस्पेशालिटी हॅास्पीटलमधे कोरोनाबाधित व ईतर रुग्णांकरीता निःशुल्क ओपिडी सुरु करण्यात आली आहे.
शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधील ओपीडी शनिवार (दि.30 एप्रिल) पासून कोरोनाबाधित व ईतर रुग्णांकरीता निशुल्क ओपिडी केलेली आहे. गरजू रूग्णांनी या मोफत ओपीडी चा लाभ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तर सांयकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत घ्यावा असे आवाहन डॉ. विवेक नि. शिंदे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवि शिंदे यांनी केले आहे.