नागपुर जिल्हात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, पदवी नसतांना करत होता इलाज.

42

नागपुर जिल्हात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, पदवी नसतांना करत होता इलाज.

नागपुर जिल्हात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, पदवी नसतांना करत होता इलाज.
नागपुर जिल्हात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, पदवी नसतांना करत होता इलाज.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.1 मे:- नागपुर जिल्हातील सावनेर तालुक्यातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सावनेर तालुक्यात एका बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश झाला आहे. या बोगस डॉक्टराने नागपुर जिल्हातील ग्रामीण भागात आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात थाटला होता. कुठलाही पदवी नसताना हा बोगस डॉक्टर भोळ्याभाबड्या गावक-याची मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत. असे सावनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांचा लक्षात आले यांनी या बोगस डॉक्टराचे पितळ उघडकीस आणले.

सावनेर तालुक्याच्या उमरी या गावात डॉ. विश्वजित विष्णोई या झोलाछाप डॉक्टरांनी थाठलेला दवाखाना कायमचा बंद करण्यात आला. या झोलाछाप डॉक्टरांकडे ना वैद्यकीय पदवी ना वैद्यकीय परवानगी आहे. उपचारानंतर रुग्णांची तब्येत बिघडली की, त्यांना दुसरीकडे उपचार घेण्याचा सल्ला देतात. तोपर्यंत रुग्णांकडून पैसे उकळतात. उशीर झाल्यास रुग्ण दगावण्याचा प्रकार घडू शकतो. उमरी परिसरात जवळपास शंभरच्या वर पोहोचलेली कोरोनाबाधितांची संख्या व एकाच महिन्यात झालेल्या दहा ते अकरा लोकांच्या मृत्यूमुळे प्रशासन अधिकच गंभीर झाले. या कारणांचा शोध व उपाययोजनेसाठी उमरी येथील ग्रामपंचायतमध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रतिनिधी, कोरोना योद्धे व डॉक्टरांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विष्णोई आले होते. त्यांना वैद्यकीय पुराव्याबद्दल विचारले असता त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. नागणे यांनी वैद्यकीय पदवी परवाना किंवा इतर कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. कारवाई प्रस्तावित आहे. मात्र, दवाखाना बंद करण्याचा आदेश दिल्याने त्याने गावातून पळ काढल्याचे समजते.