गोंडखैरी येथील दारू भट्ट्या वर पोलिसांची धाड 22 जणांवर गुन्हे दाखल 42 लाखांचा मुद्देमाल जप्त.

युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
कळमेश्वर/नागपूर,दि.1 मे:- कळमेश्वर गुन्हे शाखा आणि कळमेश्वर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडखैरी बरड येथील मोहा फुलांच्या दारू भट्ट्या वर कळमेश्वर पोलिसांनी धाडी टाकल्या त्यात 22 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण 42 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.

 कळमेश्वर तालुका येथील बरड हा भाग हा फुलाचा दारू निर्मिती अवैद्य दारू विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. लाकडाऊन मुळे दारूची दुकाने बंद असल्याने येथील अवैध दारू निर्मिती व विक्रीला उत्थान आले आहे. त्याचा स्थानिक गुन्हे शाखा व कळमेश्वर पोलिसांनी या संपूर्ण दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आले असून येथील पोलिसांनी 22 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यात शिवाय त्यांच्याकडून 42 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात 1840 लिटर दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन मोहा फुल सडवा 474 लिटर मोहा फुलाची दारू 98 ड्रम व घमेले व इतर साहित्याचा समावेश आहे.

याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई कळमेश्वर पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे, खडसे, मेश्राम,  सावळा पोलीस निरीक्षक बुंदे, मुंडे, गायकवाड  पोलीस टीम या पथकाने ही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here