चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर दि. 30 एप्रिल:- राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार दि. 1 मे 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 1 मे 2021 रोजी सकाळी 5:00 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 7:30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन. सकाळी 8:00 वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहतील.

दुपारी 12:00 वाजता चंद्रपूरवरून सिंदेवाहीकडे प्रयाण करतील. दुपारी 1:30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव राहतील. दुपारी 2:00 वाजता सिंदेवाही येथील कोविड केअर सेंटरला अधिकाऱ्यांसमवेत भेट देतील. दुपारी 2:15 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे कोविड-19 संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील.

सायंकाळी 4:00 वाजता सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6:00 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here