कळमेश्वर तालुक्यात टेस्टिंग किड्स तुटवडा कोविंड चाचणी केंद्रावर नागरिकांची गर्दी.

49

कळमेश्वर तालुक्यात टेस्टिंग किड्स तुटवडा कोविंड चाचणी केंद्रावर नागरिकांची गर्दी.

कळमेश्वर तालुक्यात टेस्टिंग किड्स तुटवडा कोविंड चाचणी केंद्रावर नागरिकांची गर्दी.
कळमेश्वर तालुक्यात टेस्टिंग किड्स तुटवडा कोविंड चाचणी केंद्रावर नागरिकांची गर्दी.

युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.1 मे:- कळमेश्वर शहरासह संपूर्ण तालुक्यात कोरोना संक्रमणाचा जोर कायम आहे मात्र तालुक्यात कोरोना टेस्टिंग किटचा रॅपिड एनटीजेन किटचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाल्याने चाचणी केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. ही गर्दी देखील कोरोना संक्रमणास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यातील केवळ 300 आर.टि.पी.सी.आर टेस्ट केली जात असल्याची माहिती डॉक्टर इंगळे यांनी दिली शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आता स्वतःहून कोरोना टेस्ट करायला सुरुवात केली शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक 2 व सेंटर या दोन ठिकाणी दोन्ही ठिकाणी चाचणीची सोय करण्यात आलेली आहे. दोन्ही ठिकाणी रोज तीनशे ते चारशे नागरिक स्टेस्ट करण्यासाठी येतात मात्र रॅपिड ऑंटीझेनसाठी वापरल्या जाणाऱ्या टेस्टिंग किट संपल्याने तसेच वेळेस पुरवठा केला जात नसल्याने तेथे चाचणीसाठी येणाऱ्यांना आपल्या पावली परत जावे लागते.

रॅपिडएनटी टेस्टिंग किटचा पुरवठा होत नसल्याने फक्त गंभीर रुग्णाची आर.टि.पी.सी.आर टेस्ट केली जात आहे. आर टी पी सी आर टेस्टचे स्लॅब नमूने नागपूरला तपासणीसाठी पाठवले जातात त्याचप्रमाणे त्यांचे रिपोर्ट यायला आठ ते दहा दिवस विलंब होत आहे. त्यामुळे शहरात ग्रामीण रुग्णालय मार्फत शंभर टेस्ट व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रत्येकी पन्नास याप्रमाणे दोनशे असे एकूण 300 टेस्ट केल्या जात आहेत. टेस्टिंग किट प्राप्त होताच त्याचे प्रमाण वाढण्यात येईल डॉक्टर प्रीती इंगळे अध्यक्ष ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर तालुक्यात सध्या रोज 300 नागरिकांच्या आर.टि.पी.सी.आर केल्या जात आहे. आर.टि.पी.सी.आर तसेच रॅपिड ऑंटीझेन टेस्ट प्रमाण वाढवण्यात येईल असे तहसीलदार सचिन यादव यांनी सांगितले.