जाम चौरस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि ट्रेलर भीषण अपघात. मोठी जीवीत हानी टळली.

✒प्रशांत जगताप,प्रतिनिधी✒
समुद्रपुर:- तालुक्यातील जाम येथे एक ट्रॅव्हल्स आणि ट्रेलर अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. दि. 29 ला राष्ट्रीय महामार्ग 44 वर असलेल्या जाम चौरस्त्यावर रात्री 12 च्या सुमारास आर.जे 09 जी.सी. 3025 ट्रेलर आणि एम.एच- 31- एफ.सी- 5185 ट्रॅव्हल्सचा अपघात झाला.
प्राप्त माहितीनुसार 09 जी.सी. 3025 नंबरचा ट्रेलर हा नागपुर कडून चंद्रपुरच्या दिशेने जात होता. तर हैद्राबाद कडून नागपुरचा दिशेने जात असलेली एम.एच- 31- एफ.सी- 5185 नंबरची ट्रॅव्हल्स ही भरधाव येत होती. चालकांचे नियंत्रण सूटल्याने ट्रॅव्हल्स चालकाने जाम चौरस्त्यावर ट्रेलरला माघून भीषण धडक दिली. यात ट्रॅव्हल्स चालक त्रिभुवन मणीकपुरेच्या पायाला गंभीर मार लागला. ट्रॅव्हल्स मधिल इतर प्रवाशी किरकोळ जखमी झाले.
या अपघाताची माहीती मीळताच जाम येथील महामार्ग पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी लोकांना बाहेर काढून उपचारासाठी समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल करुन पुढिल तपास पोलीस करत आहे.