घ्यायला गेली कोरोना लस, झाला तरुणीवर सामूहिक बलात्कार.

पाटणा,01 मे:- देशात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा फैलाव होत आहे. देशात रोज लाखो कोरोना वायरस बाधित समोर येत आहे. त्यामूळे सर्वीकडे भितीदायक वातावरण दिसून येत आहे. त्यात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना वायरस प्रतिबंधात्मक लस देण्याच्या बहाण्याने एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहीती ने देशाला हादरून सोडले आहे. नराधमाने एका मुलीला कोरोना वायरसची लस देण्याच्या बाहाण्याने एका निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला आहे. बलात्कारास विरोध केला असता आरोपींनी तिचे हात-पाय बांधून तोंडात रुमालही कोंबला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही नराधम आरोपींना अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.
संबंधित घटना बिहारमधील जमुनापूर परिसरातील आहे. येथील एका तरुणीला आरोपी रॉकी आणि मंटूने कोव्हिड लस देण्याचं आमिष दाखवून जमुनापूर भागातील एका निर्जन घरात नेलं. याठिकाणी दोघांनी पीडित तरुणीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. यावेळी पीडित तरुणीने याला विरोध केला. तेव्हा आरोपी रॉकी आणि मंटूने पीडितेचे हात-पाय घट्ट बांधले. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडितेच्या तोंडात रुमालही कोंबला. यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.