अस्वल व जंगली डुकराच्या हल्ल्यात महीलेसह तिघे जखमी
अस्वल व जंगली डुकराच्या हल्ल्यात महीलेसह तिघे जखमी

अस्वल व जंगली डुकराच्या हल्ल्यात महीलेसह तिघे जखमी

अस्वल व जंगली डुकराच्या हल्ल्यात महीलेसह तिघे जखमी
अस्वल व जंगली डुकराच्या हल्ल्यात महीलेसह तिघे जखमी

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
माहूर:- माहूर तालुक्यातील दत्त मांजरी येथील शेळकी रोहीदास पूरण जाधव हा दि.30 एप्रील रोजी दु.12 वाजण्याचे सुमारास शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी काळेपाणी या कुंडावर गेला असता झुडपात लपून बसलेल्या अस्वलाने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. तर दुपारी 3 वाजताच्या आसपास वझरा शे.फरीद येथील अनुसया रावसाहेब केंद्रे व श्रीराम बापु घुगे हे दोघे शेतात काम करीत असतांना रानडूकराने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. तिघांनाही माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्यंकटेश भोसले व वैद्यकीय अधिकारी डॉ.बोडखे यांनी तिघावर प्राथमिक इलाज करून स्थलांतरीत करण्याचा सल्ला दिल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले.

वनपाल मीर साजिद अली, वनरक्षक अमोल गेडाम व निखील क्षीरसागर यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून अस्वल हल्ल्यातील गंभीर जखमी झालेल्या रोहीदास जाधव याला तात्पुरती आर्थिक मदत केली.

अस्वल व जंगली डुकराच्या हल्यात जखमीं झालेल्या तिघांनाही तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी वनपरिक्षेत्र अधिका-यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here