मीडिया वार्ता न्यूज रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय चे उदघाटन माणगांव पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील साहेब याच्या हस्ते
मीडिया वार्ता न्युज
०१ मे,रायगड: सर्व सामान्य नागरिकांच्या न्यायासाठी लढणारा एकमेव मीडिया वार्ता न्यूज रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय माणगांव उदघाटन सभारंभ गुरुवार दि २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता माणगांव पोलीस ठाण्याचे उप विभागीय अधिकारी मा श्री प्रवीण पाटील साहेब याच्या हस्ते रिबीन कापून उदघाटन करण्यात आले, यावेळी कार्यक्रमात मीडिया वार्ता न्यूज चे संपादक श्री भागूराम सावंत, उपसंपादक श्री काशिनाथ बारामते, सह संपादक मनोज कोब्रागडे, मुंबई बिरो चीफ मनोज कांबळे, रायगड जिल्हा प्रतिनिधी जितू पवार, दयाणंद सावंत, वामन सोनावणे, राजा सावंत यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे उपस्थित मान्यवरचे शाल श्रीफळ व फुल गुच्छ देऊन स्वागत केले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय माणगांव उदघाटन समारंभ आयोजक माणगांव तालुका प्रतिनिधी सचिन पवार, निजामपूर विभाग प्रतिनिधी मंगेश मेस्त्री, माणगांव शहर प्रतिनिधी भालचंद्र खाडे, महाड तालुका प्रतिनिधी किशोर किर्वे, मुरुड तालुका प्रतिनिधी संतोष हिरवे, महाड शहर प्रतिनिधी राकेश देशमुख, रेश्मा माने, यांनी प्रत्येक येणाऱ्या मान्यवराचे शाल नारळ तसेच फुल गुच्छ देऊन स्वागत केले व अनमोल अशी मेहनत घेतली.
रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय माणगांव कार्यालयाला माणगांव नगरपंचायत चे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगरअध्यक्ष सचिन बोबले, नगरसेवक कपिल गायकवाड, त्याच प्रमाणे माणगांव तालुका पत्रकार अध्यक्ष संतोष सुतार, पदमाकर उभारे, गौतम जाधव, हरेश मोरे त्याच प्रमाणे अन्य मान्यवरांनी माणगांव कार्यालय ला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.