ए जी चषकाचे आई जननी कुंभळजाई पैठण संघाला विजेतेपद तर शिवगर्जना लोहारे संघाला उपविजेतेपद

58

३८४ खेळाडूंचा सहभाग असणाऱ्या भव्य क्रिकेट स्पर्धेत आई जननी कुंभळजाई पैठण संघाने विजेतेपद पटकावले. त्यांना प्रथम क्रमांकाचे ५१,१११ रुपये रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले

 

संदिप जाबडे
२८ एप्रिल, पोलादपूर

पोलादपूर(रायगड)- सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत ए जी चषकाचे बहारदार आयोजन २३ व २४ एप्रिल २०२२ रोजी नेरुळ, नवी मुंबई येथे पार पडले. स्पर्धेत तब्बल ३२ संघानी सहभाग नोंदविला. सर्व ३२ संघांना टी शर्ट हे या स्पर्धेचे वैशिष्ट ठरले. प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूला चषक देण्यात आले.

३८४ खेळाडूंचा सहभाग असणाऱ्या भव्य क्रिकेट स्पर्धेत आई जननी कुंभळजाई पैठण संघाने विजेतेपद पटकावले. त्यांना प्रथम क्रमांकाचे ५१,१११ रुपये रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले. उपविजेता शिवगर्जना लोहारे संघ ठरला. लोहारे संघाला द्वितीय क्रमांकाचे २५१११/- रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक श्री गणेश कुडपण तर चतुर्थ क्रमांक मावळ्यादेवी क्रिकेट क्लब चांभारगणी या संघाने पटकाविला.

स्पर्धेतील मालिकावीर पैठण संघाच्या संदेश मोरे यास, उत्कृष्ट फलंदाज शिवगर्जना लोहारे संघाच्या साहिल शेडगे यास, उत्कृष्ट गोलंदाज चांभारगणी संघाच्या केशव गोळे यास तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री गणेश कुडपण संघाच्या ऋषी मोरे यांस गौरविण्यात आले. त्यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन सन्मानित केले.

ए जी चषकाचे बहारदार आयोजन करणाऱ्या आयोजक अमित घाडगे, आशिष घाडगे व सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.