स्पॉटलाईट: महाराष्ट्र माझा
सौ.संगीता संतोष ठलाल
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
मो: ७८२१८१६४८५
आज १ मे,म्हणजेच महाराष्ट्र दिन त्या निमित्ताने सर्व बंधू, भगिणींना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा जग हा कितीही मोठा असेल तरी या जगात, माझ्या भारत देशात तसेच अनेक राज्यात माझ्या महाराष्ट्र राज्याला कोणी ओळखत नाही असं होऊ शकत नाही खास करुन माझ्या महाराष्ट्र राज्याची ओळख आहे ती म्हणजेच होऊन गेलेले थोर संत, महात्मे, महापुरुष त्याच प्रमाणे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ,रयतेचा राजा श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच मी सर्व महाविभूतींना कोटी,कोटी विनम्र अभिवादन करते. आज राजेंमुळे या जगात महाराष्ट्र राज्याची विशेष ओळख आहे. मी ,स्वतःला खूप भाग्यवान समजते की, महाराष्ट्र राज्य सारख्या पावण व पवित्र अशा भूमीत माझा जन्म झाला. त्या,भूमातेला मी वंदन करते माझ्या महाराष्ट्रात असलेली संस्कृती व इथे होणारे सण, उत्सव हे, जगापेक्षा वेगळे आहेत माझ्या महाराष्ट्रात कशाचीही कमी नाही. खास करून माझ्या महाराष्ट्रात अनेक किल्हे आहेत ते सर्व किल्हे शुरवीर, चतुर असलेले मुठभर मावळे सोबतीला घेऊन मोठ्या कष्टाने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्हे जिंकून दिले व रयतेला शत्रूपासून मुक्त केले आजही इतिहास साक्षी आहे ते, सर्व पराक्रम माझ्या महाराजांनी तसेच माझ्या मावळ्यांनी करुन दाखवले आहेत.
आज ते अजरामर होऊन गेले आहेत.माझ्या महाराष्ट्रात शंभूराजे,जन्मले, थोर संत ज्ञानेश्वर माऊली, जगदगुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज, संत चोखामेळा, संत गोरोबाकाका, संत नरहरी महाराज, संत सावता माळी, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सखुबाई, संत कान्होपात्रा, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ताराबाई, रमाई, कर्मयोगी संत गाडगेबाबा,मानवतेचे पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीआई फुले, शाहू महाराज, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, वं. बाबा आमटे, बहिणाबाई चौधरी, हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके,नेते तसेच अनेक महाविभूती व कवी, कवयित्री, लेखक, लेखिका, साहित्यिक,गायक, गीतकार,चित्रकार, जन्मले,थोर समाजसुधारक याच मातीतून घडून गेले आणि अजरामर झाले. आज त्यांच्या संदेशातून, मार्गदर्शनातून, अभंगातून, मला खूप काही शिकायला मिळत असते. माझ्या महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळे आहेत, अनेक तलाव,धरणे आहेत, लोहखनिजांच्या व दगडी कोळशाच्या खदाणी आहेत, माझ्या महाराष्ट्रात गोदावरी, वैनगंगा, प्राणहिता नावाजलेल्या नद्या आहेत,माझ्या महाराष्ट्राशी जुळून असलेले माझे नाते हे वेगळे आहेत, माझ्या महाराष्ट्रात खास करून मराठी भाषा बोलली जाते त्या,सोबत झाडीबोली, वऱ्य्हाडी,ऐरानी गोंडी, व अनेक भाषा बोलल्या जातात.माझी मराठी भाषा अनेक देशात, विदेशात तसेच अनेक राज्यात राहणाऱ्या लोकांना खूप आवडते.तसेच आजही गावागावात भजन कीर्तनाचे आयोजन केले जाते, सर्व मिळून महाप्रसाद बणवतात व मिळून, मिसळून खातात,माझ्या या मातीशी जुळलेले नाते कधीच न तुटणारे आहेत माझा महाराष्ट माझ्या साठी सर्वश्व आहे. याच माझ्या मातीत नागपूर येथे पवित्र अशी दिक्षाभूमी आहे तसेच बारा ज्योतिर्लिंग पैकी तीन ज्योतिर्लिंग आहेत, देविचे साडेतीन शक्तीपीठ आहेत, माझ्या महाराष्ट्रात सर्वाचा लाडका देव चंद्रभागेच्या तिरी युगे अठ्ठावीस वर्ष उभा असलेला विठूराया आहे, देवशयनी आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी ला भक्ताचा मेळा भरतो बघून जीवन धन्य झाल्यासारखे वाटते.
माझ्या महाराष्ट्राची पुरणपोळी प्रसिद्ध आहे मी, प्रत्येक सणाला आवर्जून बणवत असते, त्याच प्रमाणे माझ्या महाराष्ट्रात असलेला गडचिरोली आदिवासी जिल्हा आहे तेथे वडसा (देसाईगंज) या शहराची खास ओळख आहे ती म्हणजेच झाडीपट्टी रंगभूमी म्हणून अनेक तेथे प्रेस आहेत चार महिने लगातार कंपनीच्या नाटकांचे आयोजन केले जाते, बरेच नाट्यकलावंत सुद्धा घडून गेले आहेत आणि आजही घडत आहेत. सोबतच ताडोबा,कोका या, नावाने प्रसिद्ध असलेले अभयारण्य, आहेत बरेच लोक वाघ बघण्यासाठी दूरून येत असतात. माझ्या महाराष्ट्रात अनेक जातीधर्माचे लोक आहेत काही गावागावात देऊळ, मशिद, बुध्द विहार, आहेत. हेमलकसा लोक बिरादरीची ओळख आहे, सोबतच माझ्या महाराष्ट्रात राहणारे लोक एकमेकांना वेळप्रसंगी मदत करतात, मुंबई हि महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे तिला स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाते. अनेक राज्यातील कलावंत तेथे येतात व त्यांना रोजी रोटि मिळते, याच मातीत माझा बळराजा आहे भात पिकवतो व अनेक पिक काढतो.
माझा महाराष्ट्र सर्वगुणसंपन्न आहे माझ्या महाराष्ट्राचि किती गाऊ वाणी किती करु गुणगान या मातिने मला जगायला शिकवले, रहायला जागा दिले, खायला अन्न देत आहे सोबत ओळख दिली पुन्हा मला काय हवं..? जीवन धन्य झाल्यासारखे वाटते अजून लिहिण्यासारखे खूप काही आहे एवढं सारं माझ्या महाराष्ट्रात आहे. म्हणून मला अभिमानाने आदरणीय कविच्या दोन ओळीतून म्हणावेसे वाटते की,
जय,जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा