कामगार बांधवांविषयी आपुलकी असावी…
सौ.संगीता संतोष ठलाल
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
मो: ७८२१८१६४८५
आज १ मे, महाराष्ट्र दिन आहे तसच आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे आम्हां सर्वासाठी आजचा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही. म्हणून १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यात तसेच देशविदेशात राहणाऱ्या सर्व बंधू, भगिणींना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त जगातील सर्व कामगार बंधू, भगिणींना आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. या, पृथ्वीतलावर असलेला हा भला मोठा जग आहे, अनेक देश आहेत, अनेक राज्य आहेत तसेच अनेक जिल्हे सुद्धा आहेत. पण, प्रत्येक ठिकाणी राहणारे लोक मात्र परिस्थितीने एकसारखे दिसत नाही कोणी अति श्रीमंत आहे, कोणी, करोडपती आहे, कोणी गरीब आहे तसेच कोणी आपापल्यापरीने जगताना दिसत आहेत. काही लोकांना अंग झाकण्यासाठी नीट कपडे मिळत नाही तर.. काहींना खायला अन्न मिळत नाही. कोणी मदत मागायला जातात तर..मदत मिळत नाही,कोणाच्या घरी पाणी वाया जातो तर..कोणाला प्यायला पाणी मिळत नाही जो,सुखी आहे तो सुखातच आहे जो, गरीब आहे तो कायमच गरीब आहे गरीबाला कोणी ओळखत नाही हे,वास्तव सत्य आहे अशा प्रकारची आजची परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे.
पण,याच जगात व याच समाजात राहणारे असे कितीतरी लोक अति श्रीमंत, करोडपती दिसत आहेत व असे, अनेकांकडे मोठे,मोठे दुकाण आहेत, मोठे बंगले आहेत किंवा कारखाने किंवा काहींचे वेगळे उद्योग आहेत तेथे स्वतः ते,काम करताना दिसत नाही तर..फक्त, आणि फक्त गोर, गरीब मोलमजुरी करणारे,खोदकाम करणारे कामगार बंधू, भगिनी रात्रंदिवस काम करताना दिसत असतात. आपल्या कुटुंबाचे पालणपोषण करण्यासाठी स्वतः चे दु:ख विसरून कधी, कधी उपाशी, तापाशी काम करत असतात. त्याच गोर, गरीबांमुळे, कामगारांमुळे अनेक दुकाण, कारखाने, उद्योगधंदे, चालत असताना दिसून येतात . हे,कोणीही विसरता कामा नये. त्याच प्रमाणे सर्व प्रथम एक गोष्ट ती म्हणजेच ,आजपर्यंत आपण कुठे बघितले आहात का. .? आंतरराष्ट्रीय श्रीमंत दिवस किंवा आंतरराष्ट्रीय करोडपती दिवस कुठे साजरा करताना बघितले आहात का. ..? पण, दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस मात्र जिकडे,तिकडे साजरा करताना बघायला मिळत असतो हेच तर जगापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे तसेच गौरवाची सुध्दा बाब आहे. या, समाजात राहणारा कोणताही गरीब माणूस मुळात लाचार नसतो तर..कधी, कधी परिस्थिती त्याला अशा वळणावर घेऊन जाते की,इकडे आड आणि तिकडे विहीर असतो तरीही ते गरीब कामगार बंधू,भगिणी पूर्ण निष्ठने, प्रामाणिकपणे काम करत असतात, पोटाची भाकर समजून तुटपुंज्या मिळालेल्या वेतनावर व त्या कामाला एक प्रकारची पूजा समजतात. आपल्या कुटुंबांचे पालणपोषण करण्यासाठी झिजत असतात. कमी वेतन मिळत असेल तरी ते कोणालाही काहीच बोलत नाही महिना भरेपर्यंत वाट बघत असतात व मिळालेल्या वेतनातून आपल्या कुटुंबाचे पालणपोषण करतात.
या जगात राहणारे कामगार असोत किंवा आमच्या भारत देशात राहणारे कामगार असोत ते,विशेष नागरिक आहेत म्हणूनच आज त्यांचे महान कार्य पाहून कॅलेंडरवर आंतरराष्ट्रीय कामगार दिन १ मे,ला दिलेला आहे हि खूप मोठी अभिमानाची बाब आहे. काम करणारे जरी कामगार असले तरी सर्व प्रथम ते माणसे आहेत म्हणून कोणत्याही माणसांनी त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊ नये किंवा त्यांचे मन दुखेल अशा शब्दात बोलून त्यांचा अपमान करु नये कारण, परिस्थिती कधी बदलेल हे,कोणीही सांगू शकत नाही, राजाचा रंक व रंकाचा राजा कोण कधी..? बणेल याला जास्त वेळ लागत नाही. या,बाबतीत आपण ऐकले असणार. ..म्हणूनच कामगार बंधू, भगिणींची सर्वानी कदर करायला पाहिजे, त्यांच्याप्रती आपुलकी ठेवायला पाहिजे हाच खरा माणुसकी धर्म आहे.जीवन जगत असतांना नुसता पैसा महत्वाचा नसतो अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे माणूस, माणसा सारखा बणू शकतो. त्याच प्रमाणे काही लोकांचा स्वभाव जरा वेगळा असतो, कोणी दयाळू असतात तर..कोणी गरम व कडक स्वभावाचे असतात म्हणून त्याच स्वभावामुळे कामगारांना नौकर, चाकर या शब्दात बोलून हिनवत असतात पण, खऱ्या अर्थाने त्याच कामगारांमुळे त्यांचे काम चालत असतात ते, एक जरी दिवस कामावर हजर राहिले नाही तर..कोणताही मालक स्वतः त्या कामगारासारखे काम करु शकत नाही. ज्याचे काम तोच करु शकतो हे, कधी लक्षात येईल. ..? विशेषतः कामगार बंधू, भगिणींची काळजी घ्यावी, त्यांच्या अडी अडचणी जाणून घ्यावे, त्यांच्या सुखा, दुःखात आपुलकीने सहभागी व्हावे, होऊ शकेल तर..माणुसकी च्या नात्याने त्यांची मदत करावी आणि हेच तर..मालकाचे उत्तम व श्रेष्ठ कार्य आहेत फक्त, ते,सर्व करुन दाखविण्यासाठी माणुसकी, मानसिकता, आपुलकी, नि:स्वार्थ भावना असायला पाहिजे. कामगारांना विषयी पुन्हा एक अतिशय महत्वाची गोष्ट ती म्हणजेच कोणतेही कामगार धोका देणारे नसतात,कामचोर नसतात, कारण त्यांना आपल्या कुटुंबाचे पालणपोषण करायचे असते म्हणून ते,स्वतः उपाशी राहून न थकता काम करतात पण,आपले गाऱ्हाणे कोणालाही सांगत नाही हीच त्यांच्यात असलेली सर्वात मोठी महानता आहे सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे व त्यांच्या प्रती आपुलकी ठेवली पाहिजे.