कान्होजी आंग्रे वनउद्यान अलिबाग येथे वन कट्टाचे उद्घाटन संपन्न
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग-अलिबागतर्फे आयोजित “वन कट्टा” या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनिल तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उप वनसंरक्षक राहुल पाटील, रिध्दी आवले तालुका अभिमन व्यवस्थापक, अलिबाग प्रज्ञा पवार तालुका अभियान व्यवस्थापक, मुरुड यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक वनसंरक्षक भाऊसाहेब जवरे, व वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.