६६ वर्षांत पहिल्यांदा गुरुजन ऋणानुबंध सोहळा दहावी १९९८ आणि १९९७ च्या बॅच माध्यमातून मोठ्या उत्साहात नांदवी येथे संपन्न.

६६ वर्षांत पहिल्यांदा गुरुजन ऋणानुबंध सोहळा दहावी १९९८ आणि १९९७ च्या बॅच माध्यमातून मोठ्या उत्साहात नांदवी येथे संपन्न.

✍️सचिन पवार✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-गुरुजन ऋणानुबंध सोहळा इयत्ता १० वी १९९८ बॅच ची संकल्पना असलेल्या बहुचर्चित असा कार्यक्रम शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी नाम. श्री. मनोहर गजानन जोशी विद्यामंदिर नांदवी (नुतन माध्यमिक विद्यामंदिर नांदवी) शाळेत इयत्ता १०वी १९९८ आणि १९९७ बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने नांदवी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.५ वी ते १० वी पर्यंत लाभलेले गुरुजन, शिकक्षेत्तर कर्मचारी आणि शालेय संस्था विश्वस्त यांची उपस्थिती गुरुजन ऋणानुबंध सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते.या सोहळ्यासाठी विश्वस्त म्हणून मा. श्री. वसंत (भाई) सावंत साहेब (अध्यक्ष – विद्या प्रसारक मंडळ नांदवी), मा. श्री. काशिनाथ शंकर सावंत साहेब (जनरल सेक्रेटरी – विद्या प्रसारक मंडळ नांदवी), मा. श्री. विजय रघुनाथ सावंत साहेब (चेअरमन), मा. श्री. सुरेश उंडरे साहेब (विश्वस्त विद्या प्रसारक मंडळ नांदवी), मा.अॅड. श्री. जयप्रकाश सावंत साहेब (विश्वस्त विद्या प्रसारक मंडळ नांदवी), मा. श्री. विजय बाबा सावंत सर(विश्वस्त विद्या प्रसारक मंडळ नांदवी) यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.तसेच ५वी ते १० पर्यंत शिकवणारे गुरुजन मा. श्रीमती. चौगुले मॅडम, मा. श्री. जोशी सर, मा. श्री. महाजन सर, मा. श्री. बिडवे सर, मा. सौ. गोडांबे मॅडम, मा. श्री. लोधी सर, मा. श्री. मगदूम सर, मा. श्री. जाधव सर, मा. सौ. जाधव मॅडम, मा. सौ. माने मॅडम, मा. सौ. रमूला मोरे मॅडम, मा. श्री. सुरेश नांदवीकर (काका), मा. श्री. संतोष सावंत (आबा), मा. कै महादेव सावंत (भाई) याच्या परिवारातील सदस्य, मा. कै. सदानंद सावंत (बाळा काका) याच्या कुटुंबातील सदस्य, मा. कै. गणेश पुराकर काका या कुटुंबातील सदस्य हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण केंद्र ठरले.

गुरुजन ऋणानुबंध सोहळा संपन्न होण्यामागे प्रमुख भूमिका शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. म्हेत्रे सर, मा. श्री. सुर्वे सर, मा. श्री. नरके सर, मा. श्री. वावेकर सर, मा. श्री सुरळकर सर, मा. सौ. जैतपाल मॅडम, मा. श्री. शशिकांत साळवी सर, मा. श्री. अनिल सावंत (दादा), मा. श्री. महादेव कोळी (दादा) यांचे योगदान अतुलनीय होते.गेल्या ६६ वर्षाच्या प्रगल्भ वाटचालीमध्ये गुरुजन ऋणानुबंध सोहळा हा एक जणू ना भूतो ना भविष्यती अश्या प्रकारच्या अविस्मरणीय आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

१९९८ बॅच चे राजेश नांदवीकर यांच्या नियोजनातून आकार दिलेल्या या सोहळ्याचे अप्रतिम सूत्रसंचालन ९८ बॅच चे सुशील साळवी आणि ९७ बॅच चे सुबोध साळवी यांनी केले. ९७ बेंच चे योगेंद्र मगदूम यांनी प्रस्तावना केल्यानंतर सर्व विश्वस्त, गुरुजन वर्ग आणि शिकक्षेत्तर कर्मचारी यांना ९८ आणि ९७ च्या बॅच वतीने सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
पहिल्या सत्रामध्ये मा. श्री. काशिनाथ शंकर सावंत साहेब (जनरल सेक्रेटरी – विद्या प्रसारक मंडळ नांदवी) यांचे मार्गदर्शन तसेच मा. श्री. वसंत (भाई) सावंत साहेब (अध्यक्ष – विद्या प्रसारक मंडळ नांदवी) यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन लाभले.

दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थी / विद्यार्थिनी मध्ये चंदन वाणी, अमोल जाधव, विशाखा लोखंडे, राजेश नांदवीकर, नंदकिशोर खैरे आणि सुवर्णा पिचुर्ले, सचिन बाईत यांचे मनोगत झाले.तसेच झी न्यूज चे रायगड प्रतिनिधी श्री. प्रफ्फुल पवार यांचे देखील मनोगत लाभले.गुरुजन मध्ये मा. सौ. रमूला मोरे मॅडम, मा. श्री. सुरेश नांदवीकर, मा. श्री. जाधव सर, मा. सौ. जाधव मॅडम, मा. श्री. बिडवे सर, मा. सौ. गोडांबे मॅडम, मा. श्री. लोधी सर, मुख्याध्यापक मा. श्री. म्हेत्रे सर, मा. श्री. जोशी सर, मा. श्री. महाजन सर आणि दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष मा. श्रीमती. चौगुले मॅडम यांचे सुरेख मार्मिक मार्गदर्शन लाभले.गुरुजन ऋणानुबंध सोहळ्याचे आभार प्रदर्शन ९८ बॅच चे विनोद पेलनेकर याने केले व सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.गुरुजन ऋणानुबंध सोहळा यशस्वी होण्यासाठी ९८ बेंच मधून अमोल जाधव, रंजित साळवी, संदीप जाधव, मनोज नांदवीकर, आशिष विचारे, अविनाश सावंत, नितीन पास्टे, विकास चिविलकर, विजय जंगम, दिनेश येलमकर, प्रशांत जाधव, सुवर्णा पिचुर्ले, प्रज्ञा महाडिक, प्रतिभा साळवी, प्रतीक्षा निगुडकर, उज्ज्वला निगुडकर, साधना लोखंडे, ज्योस्त्रा लोखंडे तसेच ९७ बॅच मधून प्रज्ञा सावंत, नीलिमा सावंत, नंदकिशोर खैरे, योगेश नांदवीकर, संदेश नांदवीकर, महेश मानवे, नितेश मांडवकर यांनी खूप मेहनत घेतली.अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केलेल्या या प्रेरणादायी सोहळ्याची संपूर्ण पंचक्रोशीत सर्व स्तरावर कौतुक होत आहे आणि शाळेच्या आणि गुरुजनांचे आपुलकी जिव्हाळा जपण्याचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याचं सर्वाकडून अभिनंदन होत आहे.