आमदार प्रा डॉ अशोक उईकेनी घेतली बँक व्यवस्थापकांची बैठक: पीक कर्जाचा घेतला आढावा बॅंकांना दिला अल्टिमेट.

हर्षल घोडे, राळेगांव तालुका प्रतिनिधी
राळेगांव:- तालुक्यात शेतीवर आधारीत जास्त जनता आहे,यातच निसर्गावर निर्भर असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ओलिताची शेती करणाऱ्या शेतकऱ्या पेक्षा जास्त आहे . हे असले तरी सर्वच शेतकरी बँक कर्ज शेतीकरण्या साठी घेतात .शेतीचे दिवस जवळ आले असतांना तालुक्यातील बँक व्यवस्थापकांची बैठक उपविभागीय अधिकारी यांच्या सभा हॉल मध्ये घेण्यात आली. यात पीक कर्जाचा आढावाआमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी घेतल्या गेला .यावेळेस उपविभागीय अधीकारी शैलेश काळे, तहसीलदार डॉ रवींद्रकुमार कांडजे, तालुका कृषिअधिकारी मनीषा गवळी नप चे मुख्याधिकारी अरूण मोकळ,तालुका ऐ आर कैलास कटारे,भाजपा तालुका अध्यक्ष तथा जी प सदस्य चित्तरंजन कोल्हे,पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे, जी प सदस्य प्रीतिताई काकडे, भाजपा शहर अध्यक्ष डॉ कुणाल भोयर उपस्थित होते.आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी तालुक्यातील बँक व्यवसस्थापक यांना दिलेल्या पीक कर्जाच्या वाटपाचा लक्षांश किती व वाटप किती याची विचारणा केली. या वेळेस राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना दिलेल्या लक्षांशा नुसार वाटप केले नाही हे लक्षात आले तेव्हा आमदार उईके यांनी मध्यवर्ती सहकारी बँक जर आपल्या सभासदांना पीक कर्जाचे पूर्ण वाटप करू शकते तर राष्ट्रीय कृत बँका करू शकत नाही अशी विचारणा बँक व्यवस्थापकांना केली.राष्ट्रीय कृत बँकांनी जर येत्या सात जून पर्यन्त कर्ज वाटपाच्या संदर्भात उपाय योजना न केल्यास तालुक्यातील सर्वच बँक कार्यालया समोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी आढावा बैठकीत दिला. याच आढावा बैठकीत तालुका कृषी अधिकारी यांना बोगस बियाण्याच्या संदर्भात केलेल्या कार्यवाही ची विचारणा केली व तालुक्यातील सर्वच कृषी केंद्राची तपासणी करून बोगस बियाणे विक्रेत्यावर कठोर कार्यवाई करावी कुठल्याही शेतकऱ्याला आर्थिक नुकसान व फसवणूक होऊ नये याची दक्षता कृषी अधिकारी म्हणून तुम्ही घ्यावी अशी सूचना आमदार उईके यांनी केली. आढावा बैठकीत तालुक्यातील शेतकऱ्याच्या समस्यांवर चर्चा झाली आमदार प्रा डॉ अशोक उईके आज पीक कर्ज पीक विमा बोगस बियाणे या विषयावर आक्रमक दिसून आले.