बलात्काऱ्यास १० वर्षांचा कारावास
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील टांगारा येथील एका मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. अन्सारी यांनी सोमवारी १० वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. रामू बापूराव टेकाम, (७०, रा. शेडवाही, ता. गादीगुडा, जि. आदिलाबाद) असे शिक्षा बलात्काऱ्याचे नाव आहे. टांगारा येथील पीडित मुलगी चार वर्षांपूर्वी ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेली होती. काही दिवसांनी घरी परत आल्यावर कुटुंबीयांना ती उलटी करताना दिसली. मुलीला विचारपूस केली असता रामू टेकाम याने जीवे मारण्याची धमकी देऊन शारीरिक शोषण केल्याचे तिने सांगितले.