प्रभाग समिती अ च्या सभापती संजना कदम यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व नालेसफाई कामासंदर्भात बैठक संपन्न
संतोष आमले
पनवेल तालुका / प्रतिनिधी
9220403509
पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती अ कार्यालयांमध्ये मान्सूनपूर्व नालेसफाई कामासंदर्भात प्रभाग समिती अ सभापती संजना समीर कदम यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
त्यावेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, तसेच नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, नीलेश बाविस्कर,रामजी बेरा, नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, प्रभाग समिती अधिकारी जितेंद्र मढवी, सर्व प्रभागांमधील आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. यावेळी मान्सूनपूर्व नालेसफाईमध्ये ग्रामीण भागांतील नालेसफाई बाबत आढावा घेण्यात आला तसेच शहरी भागांमधे असणारे अडथळे अडचणी समजून घेण्यात आल्या तसेच प्रशासनास या अडचणी कशा पध्दतीने दूर करता येतील व कामे योग्य पद्धतीने होतील यासाठीचा विचारविनिमय करण्यात आला सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नालेसफाई संदर्भात चर्चा केली त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये ज्या ज्या सखल भागांमध्ये पाणी भरते त्या ठिकाणी पंप लावून त्या पाण्याचा उपसा करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या तसेच पावसाळ्यामध्ये कुठेही पावसाचे पाणी भरल्यास अत्यावश्यक सेवा ही तत्परतेनं त्याठिकाणी उपस्थित व्हावी यासाठीच देखील चर्चा करण्यात आली