कोकण पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार एडवोकेट प्रवीण ठाकूर यांना संधी द्यावी. रायगड जिल्हा काँग्रेसचा एकमुखी ठराव.

कोकण पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार एडवोकेट प्रवीण ठाकूर यांना संधी द्यावी.
रायगड जिल्हा काँग्रेसचा एकमुखी ठराव.

कोकण पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार एडवोकेट प्रवीण ठाकूर यांना संधी द्यावी. रायगड जिल्हा काँग्रेसचा एकमुखी ठराव.

अलिबाग
रत्नाकर पाटील
९४२०३२५९९३

अलिबाग :- रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची शेलघर येथे झालेल्या सभेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव एडवोकेट प्रवीण मधुकर ठाकूर यांना कोकण पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी असा ठराव एकमताने मंजूर करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवण्याचे ठरले या सभेला रायगड जिल्हा प्रभारी चारुशीला टोकस तसेच रायगड जिल्हा सहप्रभारी बर्गे साहेब तसेच रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत व प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील महाराष्ट्र प्रदेश महिला पदाधिकारी नंदा म्हात्रे तसेच अलिबाग तालुका काँग्रेस अध्यक्ष भास्करराव चव्हाण रायगड जिल्ह्यातील तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आल्हाद पाटील व महिलावर्ग तसेच रायगड जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीत प्रास्ताविक करताना रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर तसेच व्यासपीठावरील सर्व उपस्थित मंडळीने हात उंच करून सर्वानुमते काँग्रेसनेचे एडवोकेट प्रवीण मधुकर ठाकूर यांचे नाव एक मताने जाहीर करण्यात आले यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले की कोकण पदवीधर मतदार संघात काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला संधी द्यावी तसेच यावेळी अनेक मान्यवरांनी एडवोकेट प्रवीण मधुकर ठाकूर यांना महाविकास आघाडीने संधी द्यावी अशी काँग्रेस पक्षाची जोरदार मागणी होत आहे यावेळी एडवोकेट प्रवीण मधुकर ठाकूर मार्गदर्शन करताना म्हणाले की कोकण पदवीधर मतदार संघात मला संधी दिल्यास त्या संधीचे सोने करेल कारण माझे वडील काँग्रेसनेचे माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांनी आमदारकीच्या काळात जनतेच्या अनेक विकासाची कामे करण्यात आली आणि त्यांच्यात पावलावर पाऊल टाकून जनतेच्या विकासाचे प्रश्न तसेच पदवीधर मतदार संघाचे सुशिक्षित बेकारांचे प्रश्न शासन स्तरावर मांडून त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी व उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून पदवीधारणा नोकरीच्या संधी रोजी रोटी प्राप ् होईल यासाठी सर्वत्र सहकार्य केले जाईल आज सुशिक्षित पदवीधर तरुण तरुणींची अवस्था गंभीर आहे ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर असे मत एडवोकेट प्रवीण ठाकूर यांनी व्यक्त केले