सेवानिवृत्तांची गाठभेट
हूरहूर संपली, प्रतीक्षा सरली,
दिवस उगवला, भेटीचा,
जिवाच्या जिवलगांशी,
पुन्हा एकवार यथेच्छ,
हितगुज करण्याचा,
जुन्या आठवणी, चाळवण्याचा,
मनसोक्त गप्पा मारण्याचा. !
असे ते मैत्र मनाचं ,
नातं स्वतःचं,
मन मोकळं करण्याचं,
अन सुख, दुःखात भागीदार,
होण्याचं.!
एकदुजा सहकार्याने फुलला,
काळ उमेदीचा सरला,
सेवा निवृत्तीचा भेसूर चेहरा दिसला,
ताटातुटीचा घाव, वर्मी बसला,
पण नियतीचा खेळ, कुणाला टळला?
सेवा निवृत्ती होवून काळ,
बराच लोटलाय,
ठरवलं कैकदा, भेटायचं,
पण संसाराच्या धबडग्यात,
कायम फिसकटायचं,!
घेवून मनावर,
सहकार्यांनी शिरावर,
गोतावळा जमवण्याचा, घाट घातला,
क्षण पकडला, दिवस ठरवला,
अखेर पळ तो, आज उगवला.!
चला , भेटूयात,
क्षण मिलनाचे, मनात भरवूयात,
झालंय वय, गात्र थकलीय,
कुणास ठाऊक,
पुन्हा भेट होते की नाय.!
पुन्हा भेट, होते की नाय.!!
पुन्हा भेट, होते की नाय.!!!
कवी: अरुण निकम
मो: 9323249487
दिनांक: ०१ जून २०२५