वर्ल्ड सायकल डे च्या निमित्ताने अलिबाग मध्ये सायकल रॅली
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- वर्ल्ड सायकल डे च्या निमित्ताने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या माध्यमातून व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या सहकार्याने संडे ऑन सायकल, फिटनेस चा डोस अर्धा तास रोज या सायकल रॅलीचे आयोजन अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून करण्यात आले होते यावेळी या रॅलीस स्त्रीरोग तज्ञ डॉ. मेघा घाटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला यावेळी डॉ.महेंद्र घाटे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी, माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ.राजाराम हुलवान, अलिबाग सायकल क्लबचे स्वप्निल नाईक, जिल्हा पोलीस विभागाचे स्पोर्ट्स इन्चार्ज ऋषिकेश साखरकर, जिल्हा क्रीडा विभागाचे कर्मचारी, प्रिझम संस्थेचे खेळाडू, सायकलिंग संघटनेचे खेळाडू, क्रीडा कार्यालयाचे कर्मचारी, स्पर्धा विश्व अकॅडमीचे युवक-युवती तसेच नागरिक उपस्थित होते. अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून जे. एस. कॉलेज कॉलेज रोड, मयूर बेकरी, तहसीलदार कार्यालय, कोर्ट परिसर, हिरकोट मार्गे वरसोली समुद्रकिनाऱ्यावर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली. प्रसंगी स्त्रीरोग तज्ञ डॉ. मेघा घाटे यांनी सायकल नियमित चालवा असे आवाहन केले एक्सरसाइज केल्यामुळे शारीरिक व मानसिक फिटनेस येतो सायकलिंग चे वेगवेगळे फायदे आहेत सायकलिंग मुळे इंडॉरफिन आणि डोपामिन सगळं रिलीज होतं हे चांगले हार्मोन्स आहेत त्यामुळे आपला मूड्स चांगला राहतो डिप्रेशन जायला मदत होते जर तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट असाल तर तुम्ही येणाऱ्या दुःखाला हसत हसत सामोरे जाऊ शकता हे सर्व व्यायामाने होते त्यामुळे नियमित व्यायाम करा तसेच सायकल चालवा. याबाबत मार्गदर्शन केले. तपस्वी गोंधळी यांनी कार्यक्रमा विषयी मार्गदर्शन केले दररोज अर्धा तास आपण नियमित सायकल चालवली पाहिजे तसेच रविवारी गाडी ऐवजी सायकलवरच आपली कामे करावी या संदर्भात मार्गदर्शन केले. अलिबाग सायकल क्लबचे सदस्य स्वप्निल नाईक यांनी आपले बालपण सायकल चालवण्यातच गेले आहे सायकल चालवत लहानाचे मोठे झालो पण आत्ताचा रस्ता हा रहदारीचा आहे त्याच्यामुळे सायकल चालवताना काळजी घेऊन सायकल चालवा असे सांगितले. या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आभार जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने मानण्यात आले. सर्वांना पिण्याचे पाणी व बिस्किट यांचे वाटप करण्यात आले. सदर सायकल रॅली यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व प्रिझम संस्थेच्या सहकार्यानी परीश्रम घेतले.