*निधोना ,आंबेडकर नगर येथे १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे सरपंच आदमाने यांच्या हस्ते भूमिपूजन.*

सतीश म्हस्के जालना जिल्हा प्रतिनिधी
जालना / प्रतिनिधी : जालना तालुक्यांतील मौजे निधोना येथे १५ व्या वित्त आयोगामधुन पेव्हर ब्लॅाक बसविणे या कामाचे नारळ फोडून भुमिपुजन श्री राहुल शिवाजीराव आदमाने यांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकारांशी संवाद करतेवेळी श्री राहुल आदमाने बोलले की आम्ही दिलेल्या वचन नाम्या प्रमाणे कामे करुन गावाचा काया पालट करुन विकास कामे करु आणी गावात नागरिकांस सर्व सुख सुविधा देऊ कारण निधोना हे गाव जालना शहरा पासुन अवघ्या पाच किलोमिटर वरच असल्यामुळे भविष्यात हळुहळु जालना मधे विलीन होईल असे सांगितले.
यावेळेस गावातील नागरिक श्री माणिकराव खडके, मधुकरराव देशमुख, उपसरपंच सोनवणे, श्री शेख रज्जाक भाई, सुभाष बोर्डे ,सुरेश डासाळ, अब्राहम लोखंडे, विजय आदमाने, दिपक देशमुख, तालेब शेख संतोष साबळे, सचिन देशमुख विलास डासाळ , गजानन खडके इ. उपस्थित होते.