विवाहित भाच्यानी मामाच्या दुस-या मुलीलाही पळवुन नेले, मामाने काढला भाच्याचा काटा.

48

विवाहित भाच्यानी मामाच्या दुस-या मुलीलाही पळवुन नेले, मामाने काढला भाच्याचा काटा.

विवाहित भाच्यानी मामाच्या दुस-या मुलीलाही पळवुन नेले, मामाने काढला भाच्याचा काटा.
विवाहित भाच्यानी मामाच्या दुस-या मुलीलाही पळवुन नेले, मामाने काढला भाच्याचा काटा.

सांगली जिल्हा प्रतिनिधी

सांगली:- सांगली जिल्हातील जत तालुक्यातील खिलारवाडी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मामानेच त्याच्या स्वता:च्या भाच्याची हत्या केल्याच्या घटनेने संपुर्ण गाव हादळल आहे. भाच्याचे मामाच्या मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मृतकाने आधी एका मामाच्या मुलीसोबत लग्न झाल होतं. तरीही त्याने दुसऱ्या मामाच्या मुलीला प्रेमाचा बहाणा करुन पळवून आणलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या दुसऱ्या मामाने आपल्या भाच्याला जीवे मारलं. या घटनेमुळे जत तालुका हादरला आहे.

मृतक नाना लोखंडे हा 22 जूनपासून बेपत्ता होता. याप्रकरणी तो बेपत्ता असल्याची तक्रार जत पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या तक्रारीनुसार पोलीस त्याचा शोध घेत होते. पण कुठे मिळुन आला नव्हता. पोलिसांना त्याचा मृतदेह कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात सापडला होता. तो जत तालुक्यातील खिलरवाडी येथे वास्तव्यास होता. पण त्याचा मृतदेह कर्नाटकातील विजापुरात आढळला होता पोलीस प्रथम गोंडळात होते. मग पोलिसांनी तपास सुरु केला आणि ही हत्येची खळबळजनक माहिती समोर आली.

पोलिसांना कर्नाटकातील विजापुरात एक मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चौकशी केली असता तो मृतदेह नाना लोखंडे याचाच असल्याचं समोर आलं. पोलिसांना एकंदरीत मृतदेहाची अवस्था बघता नाना याचा खून झाल्याचा संशय आला. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता त्याची वैयक्तिक माहिती समोर आली.
मामा-भाच्यात आधी कडाक्याचं भांडण
नाना लोखंडे याचे मामाच्या मुलीशी लग्न झाले होते. असे असताना त्याने दुसऱ्या मामाच्या मुलीला पळवून आणलं होतं. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापूर्वी खिलारवाडी येथे पळवून आणलेल्या मुलीचा वडील म्हणजेच नानाचा मामा आणि त्याच्यात वाद झाला होता. दोघांमध्ये प्रचंड कडाक्याचं भांडण झालं होतं. याच कारणातून मामाने नाना लोखंडे याचा खून केला, अशी माहिती पोलिसांना तपासातून समोर आली.

पोलिसांनी आरोपी मामासह चार जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना कोर्टात हजर केलं असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जत पोलिसांनी मंगळवारी (29 जून) नाना लोखंडे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून त्याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.