पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार बंदुकीतून गोळी झाडून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न, उद्योजकाच्या पती आणि सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल.

58

पुणे जिल्हा प्रतिनिधी

पुणे,दि.1 जुलै:- पुणे जिल्हातील पिपरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीला मारहाण करून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला त्यानंतर बंदुकीतून गोळी झाडून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला याप्रकरणी पिढीत महिलेच्या पती आणि सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा सर्व प्रकार 23 मे 2019 पासून 24 जून 2019 या कालावधीतच्या सुमारास घडला.

अत्याचाराने पीडित महिलेने याप्रकरणी गुरुवारी दिनांक 1 जुलै ला हिंजवडी पोलीस ठाण्यात आपल्या पती आणि सासऱ्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने पीडित विवाहितेला मारहाण करून तिच्यावर सतत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर बंदुकीची गोळी झाडून तिला जीवनाशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. पिढीत महिलेवर अत्याचार करण्यासाठी तिच्या पतीला त्याच्या वडिलांनी प्रोत्साहन दिल्याची माहिती मिडिया वार्ता न्युज ला मिळाली आहे. तसेच विवाहित महिलेला काठीने मारहाण करण्यात आली आहे, असे पिढीत महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी पिढीत विवाहितेची तक्रार दाखल करुन पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.
पीडित विवाहितेचा सासरा हा औंध परिसरातील नामांकित उद्योजक आहे. या उद्योजकावर आणि पीडित विवाहितेच्या पतीवर यापूर्वी देखील वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर या उद्योजकाच्या सुनेचा छळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित सुनेने फिर्याद दिल्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.