प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही: मंत्री वर्षा गायकवाड

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई,दि.1 जुलै:- कोरोना वायरस महामारीने संपुर्ण राज्यात हाहाकार मजावला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खोळंबा झाला आहे. पण या महामारीत काही शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या पालकाना नाहक त्रास देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यानी यासंदर्भात महत्वपुर्ण माहिती दिली आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आणि अधिकार आहे. कोरोनाच्या काळात अनेक पालकांच्या नोकरी, व्यवसायात बाधा निर्माण झाली आहे. आर्थिक समस्यांमुळे पालकांना आपल्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे काही पालकांनी शाळेची फी भरली नाही. अशा विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक संस्थेने शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. ऑनलाईन वर्गात प्रवेश दिला नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्या पत्यावर शाळा सोडल्याचा दाखला पाठवला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशा शाळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कडक इशारात शिक्षण संस्थाना व व्यवस्थापकांना खडसावले आहे. महाराष्ट्र राज्यात शिक्षण संस्थानी कोणत्याही विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून दूर ठेवता येणार नाही.