शून्य ते पाच वयोगटातील बालकांसाठी रविवारी झालेल्या उप राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद

50

अभिजीत सकपाळ
भिवंडी प्रतिनिधी
9960096076
मिडीया वार्ता न्यूज भिवंडी, ठाणे

ठाणे दि.०१/०७/२०२१ शून्य ते पाच वयोगटातील बालकांसाठी रविवारी झालेल्या उप राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला पालकांनी उस्फुर्त दिल्याने ९० हजार ६८२ बालकांचे लसीकरण करण्यात आले. तत्पूर्वी अंबरनाथ तालुक्यातील सोनावले प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. कोरोनाचे सावट असताना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम यशस्वी पार पडली. जिल्ह्यातील मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ येथे उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. यावेळी १०६९२४ बालकांपैकी ९०६८२ बालकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये मुरबाड १३१२४, भिवंडी ३६३८७, कल्याण २५२०३, अंबरनाथ १५९६८ लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी दिली