राळेगाव येथे वसंतराव नाईक जयंती साजर

राळेगाव: -येथे महाराष्ट्र राज्य बंजारा कर्मचारी संघटना यांचेकडून वसंतराव नाईक जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वप्रथम वसंतराव नाईक यांचे प्रतिमेचे पुजन करून सुरवात करण्यात आली त्यानंतर स्व वसंतराव नाईक यांच्या कार्यावर उपस्थित मान्यवरानी प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी श्रावणसिंग वडते सर, किसन जाधव सर,रमेश चव्हाण सर, ताराचंद चव्हाण,संतोष चव्हाण,शिवाजी जाधव सर, डा जाधव,सौ जाधव,सौ चव्हाण,सौ पवार सौ जाधव तथा तरूण तरूणी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन ताराचंद पवार यांनी केले तर चव्हाण सर यांनी आभार मानले.