जळगांव पोलीस गाडीचा अपघात सहायक पोलीस निरीक्षकासह चालक पोलीस सिपाही चा जागीच दुर्दैवी मृत्यू तर तीन पोलीस कर्मी जखमी
✍🏻 *जितेंद्र कोळी* ✍🏻
*पारोळा तालुका प्रतिनिधी*
*संपर्क न.-9284342632*
*जळगांव* – एकीकडे आषाढी एकादशीचा सण राज्यभरात उत्साहात साजरा केला जात असताना दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे पोलिसांच्या शासकीय वाहनावर रस्त्यावरील झाड कोसळलं.
या दुर्घटनेत आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर सह चालक पोलीस सिपाही अजय चौधरी चा जागीच मृत्यू झाला. तर तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. ही दुर्देवी घटना गुरुवारी (२९ जून) रात्री ९:00 वाजेच्या सुमारास एरंडोल ते कासोदा दरम्यान अंजनी धरणाजवळ घटना घडली.
आषाढी एकादशीच दिवशीच दोन पोलिसांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी अशी मृत पोलिसांची नावे आहेत.
या वृत्ताला पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर काही पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन गुरूवारी रात्री पिलखोड येथे एका गुन्ह्याच्या तपासाठी निघाले होते.
यादरम्यान प्रवासात रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास एरंडोल ते कासोदा दरम्यान अंजनी धरणाजवळ चालत्या वाहनावर अचानक रस्त्यावर मोठा वृक्ष कोसळला. यात सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी हे जागीच ठार झाले.
तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तिघे गंभीर जखमी झाले.दरम्यान, घटनेची माहिती मिळाताच कासोद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना वाहनाच्या बाहेर काढण्यात आले. सर्वांना एरंडोल येथील रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
मात्र, उपचाराआधीच गंभीर जखमी असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरली. अपघाताच्या या दुर्दैवी घटनेने जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.