मोटर सायकल चोरणारा गजाआड; पाच मोटार सायकल हस्तगत नेरळ पोलिसांची धडक कारवाई

मोटर सायकल चोरणारा गजाआड; पाच मोटार सायकल हस्तगत
नेरळ पोलिसांची धडक कारवाई

मोटर सायकल चोरणारा गजाआड; पाच मोटार सायकल हस्तगत नेरळ पोलिसांची धडक कारवाई

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

नेरळ :-नेरळ रेल्वे स्टेशन पूर्व भागातील निर्माण नगरी सोसायटीच्या मोकळ्या जागेतील पार्क केलेली हिरो होंडा कंपनीची सी.डी. डीलक्स मॉडेलची मोटरसायकल क्रमांक MH ४६ CQ १८९० ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत चिराग रामचंद्र धुळे राहणार चोरावळे तालुका-कर्जत, जिल्हा-रायगड यांनी नेरळ पोलीस ठाण्यात दिनांक २७ जून २०२४ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर १७४/२२ तक्रार दाखल केली होती.

हि बाब प्रभारी अशिकारी स.पो.नि. शिवाजी ढवळे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पो. अधीक्षक अतुल शेंडे, उपविभागीय पो. अधिकारी टेळे यांच्या मार्गदर्शना खाली टीम तयार करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे, पोलीस शिपाई (३०५) निरंजन दवणे, पोलीस शिपाई (१८३६) राजेभाऊ केकान, पोलीस शिपाई (१४१५) विनोद वांगेकर, पोलीस शिपाई (१७२३) प्रशांत बेले यांना शिवाजी ढवळे यांनी मार्गदर्शन केले असता. संबंधित पथकाने घटनास्थळी कोणत्याही प्रकारे पुरावा उपलब्ध नसताना. तांत्रिक पुराव्याच्या आधारे व गुप्त बातमीदार यांच्या मदतीने गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात आरोपी सचिन सुनील सोनवणे वय ३२ वर्ष राहणार बिल्डिंग १४४/२ पाश्ता लेन, कुलाबा मुंबई यास दि. २८ जून २०२४ रोजी अटक करण्यात आली असून आरोपी याच्या ताब्यातील पाच मोटरसायकल बुलेट mh-४६-bt-६७३३ , ऍक्टिवा mh-४६-bt-३४७६, सुझुकी एक्सेस स्कुटी क्रमांक mh-०३-dq-१८६८ होंडा कंपनीची सीबी शाईन मोटरसायकल mh-४६-bz-२२४५ हस्तगत करण्यात यश आला आहे. सध्या आरोपी हा पोलीस कोठडीमध्ये असून त्याचा अधिक तपास लीगाप्पा सरगर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here