श्री रविप्रभा मित्र संस्थेचा शैक्षणिक उपक्रम वाशी, कांदळवाडा, निगडी, खारगाव बु. रा. जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप कृषी दिन साजरा करीत असताना तुम्ही या उपक्रमातुन शैक्षणिक पेरणी करीत आहात ती अनमोल आहे... ग. शि. तळा सुरेखा तांबट.

श्री रविप्रभा मित्र संस्थेचा शैक्षणिक उपक्रम

वाशी, कांदळवाडा, निगडी, खारगाव बु. रा. जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

कृषी दिन साजरा करीत असताना तुम्ही या उपक्रमातुन शैक्षणिक पेरणी करीत आहात ती अनमोल आहे… ग. शि. तळा सुरेखा तांबट.

श्री रविप्रभा मित्र संस्थेचा शैक्षणिक उपक्रम वाशी, कांदळवाडा, निगडी, खारगाव बु. रा. जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप कृषी दिन साजरा करीत असताना तुम्ही या उपक्रमातुन शैक्षणिक पेरणी करीत आहात ती अनमोल आहे... ग. शि. तळा सुरेखा तांबट.

✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा: दि. १ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधुन श्री रविप्रभा मित्र संस्था व रिलेशन रिअलटेक प्रा. लि. कं. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तळा, आणि म्हसळा तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना व अंगणवाडीतील चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य व वृक्ष वाटप करण्यात आले. यामध्ये तळा तालुक्यातील वाशी हवेली, मजगाव ताम्हाणे तसेच म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा.निगडी, खारगाव बु. या राजिप शाळांचा व अंगणवाडी यांचा समावेश होता.या वेळी वाशी हवेली रा. जि. प. शाळेत बोलताना ग. शि.तळा सुरेखा तांबट मॅडम यांनी सर्व प्रथम संस्थेच्या उपक्रमाचे स्वागत केले व संस्थेचे कौतुक देखील केले.आज कृषी दिन साजरा करून वृक्षलगड केली जाते त्याच पद्धतीने शैक्षणिक पेरणी करून याचे शिक्षण रुपी वटवृक्ष होणार आहे व उद्याचे सक्षम नागरीक घडवीत आहात ते अनमोल आहे. खेडेपाडयातील शैक्षणिक वारसा जपावा व संस्कारक्षम पिडी निर्माण करावी खरच हा सिंहाचा वाटा आहे.आपण जी चळवळ उभी केली आहे ती क्रांती घडविणारी आहे. अशा उपक्रमासाठी आमची गरज भासली तर आम्ही नवकीच पुढे येऊ असे मनोगत व्यक्त करताना सांगतिले. तसेच संस्थेचे अध्यक्ष यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि विदयार्थ्यानी उच्च शिक्षण घ्यावे, स्पर्धा परिक्षा द्यावी व उद्याचे आय. पी. एस. अधिकारी घडावे यासाठी संस्थेच्या वतीने दर वर्षी स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येते यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धा परिक्षा देण्यासाठी प्रवृत करावे हेच या माध्यमातुन सांगणे आहे.संस्थेच्या या शैक्षणिक उपक्रमाचे खरच मी स्वागत करतो आणि तुम्ही या विद्यार्थ्यांना तिमिरातुन तेजाकडे नेण्याचे कार्य करीत आहात ते खुप कौतुकास्पद आहे असे गट विकास अधिकारी माधव जाधव यांनी मनोगत करताना सांगितले. या शैक्षणिक उपक्रमासाठी अनेकांनी सहकार्याचा हात पुढे केला यामध्ये रामदेव हॉटेल म्हसळा चे मालक मुकेश रायका, जय माँ देवी शक्ती देवी डेअरी म्हसळा चे मालक प्रेम पटेल, धनंजय गृपचे डायरेक्टर सुशांत लाड, तसेच वाशी चे माजी सरपंच जगन्नाथ तांडेल असे अनेक हात मदतीसाठी पुढे येत असतांना संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव संतोष उध्दरकर यांनी या सर्वांचे कार्यक्रम ठिकाणी आभार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रम ठिकाणी तळा गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट मॅडम, म्हसळा गट विकास अधिकारी माधव जाधव, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड,तळा विस्तार अधिकारी दिपक ठाकुर, समाजसेवक मदन वाजे, गणेश वाजे, वाशी माजी सरपंच जगन्नाथ तांडेल, कांदळवाडा सरपंच बने, माजी सरपंच पांडुरंग सुतार, कांदळवाडा शा. व्य. अ.जय मोहिते, निगडी शाळा व्य. अ. मिलिंद मोरे, जाधव सर, खारगाव बु. सरपंच अनंत नाक्ती, शा. व्य. अ. हेमंत नाक्ती, संस्थेचे माजी उपाध्यक्ष नरेश विचारे,सचिव संतोष उध्दरकर, खजिनदार सुशांत लाड, समीर लांजेकर, किशोर घुलघुले, शांताराम निंबरे, शंकर कासार, सुजित काते, अमन भाई, तसेच चारही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, मदतनिस, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here