नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मनपा मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मनपा मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098

नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मनपा मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन आज मंगळवारी (ता.01 जुलै) करण्यात आले. याप्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी., श्री. अजय चारठाणकर, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, डॉ. सरला लाड उपस्थित होते. यावेळी मनपाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी रक्तदान करीत शिबीर यशस्वी केले.