हिंगणा पोलीसांनी चोरट्यांना केले जेरबंद!
सात मोटरसायकल घेतल्या ताब्यात!

सात मोटरसायकल घेतल्या ताब्यात!
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
हिंगणा पोलीसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत चोरट्यांनी विविध ठिकाणांहून लंपास केलेल्या सात मोटरसायकल ताब्यात घेत भामट्यांनाही जेरबंद केले.हे चोरटे येवढे शातीर की त्यांनी महागड्या मोटरसायकल जसं पल्सर आणि रेसर गाड्यांवरच हात साफ केला होता हिंगणा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली API जीवन भातकुले,विनोद कांबळे, अनिल झाडे,संजय तायडे,कैलाश चौहान , ध्रुव पांडे, प्रशांत निनावे ,अभय पुडके, यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींच्या मागावर राहून एका आरोपीला ताब्यात घेतले त्याच्या कडून माहिती घेऊन परत तीन आरोपी व एकूण सात वाहन ताब्यात घेण्यात आले. व आणखी काही वाहन व आरोपी ताब्यात घेण्यात येतील असेल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांनी सांगितले सर्वप्रथम हर्षल दिलीपराव देवके रा.सावंगी ता.हिंगणा यांनी आपले दोन चाकी पल्सर वाहन चोरी गेल्याची तक्रार दाखल केली त्याच्याच आधारे ही पाच लाख पाच हजार रुपयांची वाहन चोरी उघडकीस आली आहे.त्या बाबत हिंगणा पोलीस स्टेशन व कर्मचारी यांचे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.