कुपोषण मुक्तीचे सेवा कलश आणि बाळु चे कार्य प्रेरणादायी: नगराध्यक्ष अरुण धोटे.

कुपोषण मुक्तीचे सेवा कलश आणि बाळु चे कार्य प्रेरणादायी: नगराध्यक्ष अरुण धोटे.

कोरपना येथे सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २५ कुपोषित बालकांना सकष आहार भेट.

कुपोषण मुक्तीचे सेवा कलश आणि बाळु चे कार्य प्रेरणादायी: नगराध्यक्ष अरुण धोटे.
कुपोषण मुक्तीचे सेवा कलश आणि बाळु चे कार्य प्रेरणादायी: नगराध्यक्ष अरुण धोटे.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) प्रतिनिधी
 9923497800

कोरपना :- आमदार सुभाष धोटे यांच्या सामाजिक दायित्वातून सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे यांच्या पुढाकाराने आणि बाळु संस्थेच्या माध्यमातून कोरपना तालुक्यातील २५ कुपोषित बालकांना प्रत्येकी एक या प्रमाणे बाळु साहित्य किट भेट देण्यात आली. या प्रत्येक किट मध्ये २ किलो मोट, २ किलो चना, २ किलो मुंग, २ किलो बरबटी, २ किलो वटाना, १ किलो नाचणी, १ किलो शेंगदाणे, १ किलो गुळ हे बाळु साहित्य भेट देण्यात आले.

या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले की राजुरा विधानसभा क्षेत्रातून कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी पुढाकार घेतला आहे ही अभिनंदनीय बाब आहे. सेवा कलश फाऊंडेशन व बाळु यांचे सर्व सहकारी परिसरातून ही समस्या पुर्णपणे हद्दपार करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या दोन्ही संस्थेचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने या क्षेत्रातून कुपोषण ही समस्या आटोक्यात येण्यास मदत होईल यात शंका नाही.

या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक अभिजीत धोटे, प्रमुख अतिथी उपसभापती सिंधुताई आस्वले, जी.प. सदस्य विनताई मालेकर, जि प सदस्य कल्पनाताई पेचे, प स सदस्य तथा माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी जि प सदस्य उत्तम पेचे, सुरेश मालेकर, माजी उपसभापती संभाशीव कोवे, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, नितीन बावणे, सेवा कलश फाऊंडेशनचे सचिव शंतनू धोटे, गटविकास अधिकारी बाबाराव पाचपाटील, सीडीपीओ गणेश जाधव यासह कुपोषित बालक, त्यांचे आईवडील, अंगणवाडी सेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बाळु संस्थेचे अध्यक्ष अमित महाजनवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संस्थेच्या सदस्यांनी अनमोल सहकार्य केले.